Nashik Cyber Crime: माजी सैनिकाला सायबर भामट्यांनी घातला गंडा

Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

Nashik Cyber Crime : फॉरेक्स मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून अज्ञात सायबर भामट्यांनी एका माजी सैनिकाला तब्बल १६ लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी नाशिक ग्रामीण सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ex soldier fraud by cyber goons Nashik Cyber ​​Crime)

Cyber Crime
Jalgaon Cyber Crime : ‘केवायसी’च्या नावाखाली केळी ग्रुपचालकाची फसवणूक

मंगेश कारभारी रहाणे (रा. अमृतनगर, ओझर मिग, ता. निफाड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या २६ ऑगस्ट रोजी अज्ञात सायबर भामट्याने मोबाईलवरून संपर्क साधला आणि त्यांना फॉरेक्स मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याचे सांगत, त्यातून जादा परताव्याचे आमिष दाखविले.

माजी सैनिक रहाणे यांनी सायबर भामट्यावर विश्वास ठेवला. संशयितांनी त्यांचे एफएक्स ऑक्सफोर्डमध्ये रहाणे व साक्षीदारांचे डिमॅट अकाऊंट उघडून दिले आणि त्यात आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगितले.

त्यानुसार २६ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या दरम्यान त्यांनी १६ लाख ८२ हजार ७९७ रुपयंची गुंतवणूक केली. परंतु गुंतवणूकीनंतरही जादा परतावा मिळाला नाही. उलट संशयितांनीकडून गुंतवणूक करण्यास सांगितले जात होते.

त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नाशिक ग्रामीण सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार आयटी ॲक्टनुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सत्यजित आमले हे तपास करीत आहेत.

Cyber Crime
Solapur Cyber Crime : पासवर्ड स्ट्राँग ठेवा, अन्यथा तुमचा मोबाईल होईल हॅक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()