Nashik News : इंदिरानगर बोगदा वाढीचे नेमके श्रेय कोणाचे? भाजप पाठोपाठ शिवसेनेची फलकबाजी!

Banner
Banneresakal
Updated on

नाशिक : मुंबई महामार्गावरील विल्होळी नाका ते आडगाव नाका दरम्यान उड्डाणपूल झाल्यापासून कायम वादात राहिला आहे. इंदिरानगर बोगद्याची रुंदी वाढविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्यानंतर इंदिरानगर बोगद्याच्या लांबी वाढीचे श्रेय घेण्याची स्पर्धा राजकीय पक्षांमध्ये लागली आहे. बोगद्याजवळ भाजपने बॅनरबाजी केल्यानंतर आता शिवसेनेनेदेखील या भागात बॅनरबाजी करून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. (exact credit for Indiranagar tunnel extension BJP Shiv Sena taking credit through banners Nashik News)

उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर इंदिरानगर व राजीवनगर बोगद्याचा प्रश्न प्राधान्याने समोर आला. विशेष करून इंदिरानगर बोगद्या संदर्भात नागरिकांनी विशेष मागणी केली. भुजबळ फार्मजवळ पुलाला उतार देण्याची आवश्यकता नसताना तो दिला गेला.

राजकीय नेत्यांच्या सोयीसाठीचा आरोप प्रथम झाला. त्यानंतर बोगद्याजवळ अपघात होऊन यात काहींना जीव गमवावा लागला, तर काही वाहनधारक कायमचे जायबंदी झाले. पूर्वी बोगद्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. असे अनेक प्रयोग झाल्यानंतरही येथील वाहतूक समस्या सुटली नाही.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Banner
MGNREGA : ‘रोहयो’च्या सुधारित आकृतीबंधामधील विभागातील मंजूरपैकी बहुतांश पदे रिक्त!

केंद्रीय दळणवळण मंत्र्यांकडे बोगद्याची लांबी वाढविण्याची मागणी होण्यापूर्वी सलग उड्डाणपूल तयार करण्याची मागणी होती. परंतु, तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने नकार देण्यात आला. त्यावर उपाय म्हणून आता राजीवनगर व इंदिरानगर येथे लांबी वाढवली जाणार आहे. रविवारी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी इगतपुरी येथे उद्‌घाटनानिमित्त आले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

त्या वेळी त्यांनी निधी तरतूद करण्याची घोषणा केली. त्यानंतर पुलाच्या कामाच्या मुद्द्यावरून श्रेयवादाचे युद्ध सुरू झाले आहे. भाजपकडून काही दिवसांपूर्वी येथे फलक लावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला, तर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून येथे बॅनरबाजी करून शिवसेनेने केलेल्या प्रयत्नांचे मार्केटिंग केले जात आहे.

Banner
Nashik News : गुन्‍हा दाखल उमेदवार गुणवत्ता यादीत; आरोग्‍य विद्यापीठ भरतीत आणखी संशयित आले समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.