Rahul Gandhi : हुकूमशाहीचा अतिरेक, लोकशाही धोक्यात! काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया

Rahul Gandhi News
Rahul Gandhi Newsesakal
Updated on

नाशिक : सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांनी २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेने काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा सचिवालयाने कायद्यानुसार राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरुद्ध देशांसह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहर व जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (Excess of dictatorship democracy in danger Angry Congress reaction on rahul gandhi defamation case disqualified nashik news)

"लोकसभेत राहुल गांधी यांना बोलू दिले नाही, त्यांचा माईक बंद केला. ही हुकूमशाहीच आहे. (स्व.) इंदिरा गांधींनी अशा अत्याचारी व्यवस्थेचा सामना केला होता, आता राहुल गांधी करत आहेत. ज्याप्रमाणे इंदिराजींनी जनता पक्षाचा पराभव केला त्याच पद्धतीने राहुल गांधी भाजपचा पराभव करतील. राहुल गांधी यांना घाबरूनच त्यांच्यावर कारवाई केली आहे."

- शिरीषकुमार कोतवाल, माजी आमदार

"देशात हुकूमशाहीचा अतिरिक्त झाला असून लोकशाही धोक्यात सापडली आहे. भ्रष्टाचार, सरकारविरोधात बोलणे गुन्हा झाला आहे. संसदेत राहुल गांधी यांनी माफी न मागितल्याने न्याय व्यवस्थेवर दबावतंत्राचा वापर करून, कारवाई केली आहे. खासदारकी गेली तर, राहुल गांधी यांचा आवाज दाबू शकणार नाही."

- राजाराम पानगव्हाणे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Rahul Gandhi News
Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधीवरील कारवाई चुकीची; अशी घाई सरकारने... - बच्चू कडू

"ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सदस्यपद रद्द करण्याची तत्काळ कारवाई करण्यात आली हे राजकारण अतिशय सूडबुद्धीचे आहे. देशातील महागोटाळे उघड करणाऱ्या आणि देशातील जनतेचा आवाज बनलेल्या राहुल गांधींना अशा दडपशाहीने शांत करू शकत नाही. राहुल गांधी अशा कारवायांना घाबरत नाही. अवघ्या देशातील जनता त्यांच्या समवेत आहे. लोकशाहीला काळिमा फासण्याचे कृत्य भाजप सरकारने केलेला आहे त्याचा जाहीर निषेध."- अॅड. आकाश छाजेड, शहराध्यक्ष, नाशिक शहर काँग्रेस

"राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भारतीय जनता पक्ष राहुल गांधी यांना जास्तच घाबरू लागला आहे. लोकसभेत गांधी यांनी अदानी-मोदी संबंधाचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यातूनच भाजपने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे."- प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

Rahul Gandhi News
Rahul Gandhi : पत्रकाराने राहुल गांधींना असं काय विचारलं की, त्यांना राग कंट्रोल नाही झाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.