नाशिक : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) नाशिक यांच्यातर्फे बुधवारी (ता.२) गोपाष्टमी महोत्सव जल्लोषात साजरा झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गोवर्धन पूजेनिमित्त भाविकांमध्ये उत्साह बघायला मिळाला. महोत्सवाला पहाटे पाचला मंगल आरतीने सुरवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद्भागवत प्रवचन झाले. तर सायंकाळी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभूंचे प्रवचन झाले. (Excitement of Gopashtami Govardhan Puja at ISKCON Temple Nashik Latest Marathi News)
भाविकांशी संवाद साधताना ते म्हणाले, की वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत गोपाळकृष्ण गोवत्साचे पालन करत होते. गोपाळकृष्णाच्या वयाच्या सहाव्या वर्षी नंद महाराज व अन्य वरिष्ठ गोपींनी कृष्णाला आता गोचरण करण्याची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला. गोचरण करण्यासाठी मुहूर्त बघितला गेला व हा दिवस कार्तिक शुक्ल अष्टमीचा होता. याबाबतचे रंजक प्रसंग त्यांनी उपस्थित भाविकांना उलगडून सांगितले. कार्तिक महिन्यात वृंदावनाचे व तेथे झालेल्या कृष्ण लिलांचे स्मरण केल्याने व्यक्ति पवित्र होतो.
गोपाष्टमीच्या दिवशी श्री कृष्णाने आपले गायींवरील प्रेम व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याने गोसेवेचे व्रत या दिवशी करायला हवे. आपल्या संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा दिला जातो व तिच्या सेवेसाठी आपण सज्ज व्हावे, असे ते म्हणाले. गोपाष्टमीनिमित्त विग्रहांची सुंदर सजावट करण्यात आली होती. राधाराणी, ललिता सखी व विशाखा सखी यांनी गोपवेष परिधान केला होता. आलेल्या सर्व भाविकांनी दामोदर अष्टक गात राधा दामोदर यांना दिवा अर्पण करून पूजा केली. गोवर्धन शिळेची परिक्रमा केली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.