नाशिकच्या भाजप नगरसेवकांच्या मुंबई वारीने खळबळ!

bjp
bjpesakal
Updated on

नाशिक : मागील आठवड्यात भाजपमधील (bjp) काही नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी (ता. २३) पुन्हा काही नगरसेवकांनी मुंबईमध्ये पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. विविध कार्यक्रमांच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने ही भेट असल्याचे सांगितले जात असले तरी भेटीतून गिरीश महाजन गट सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. (Excitement-over-Mumbai-meeting-of-Nashik-BJP-corporators-marathi-news)

गिरीश महाजन गट सक्रिय?

मागील आठवड्यात भाजपच्या काही नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर नाशिकमध्ये सर्वाधिकार प्रभारी जयकुमार रावल यांच्याकडे देण्याचे निश्चित झाल्याने भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चार दिवस भाजपमध्ये शांत होते. मात्र, आज काही नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विविध कार्यक्रमांचे निमंत्रण दिले. येत्या काळामध्ये सातपूरमध्ये एका शाळेचे उद्‌घाटन, तसेच शहरामध्ये विविध विकासकामांचे उद्‌घाटन घेण्याचे निमंत्रण देण्यात आले. त्या अनुषंगाने फडणवीस हे पुढच्या आठवड्यात नाशिक मध्ये भेट देण्याची शक्यता आहे. परंतु, या भेटीच्या निमित्ताने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. आज स्थायी समितीचे सभापती गणेश गीते, माजी स्थायी समितीचे सभापती हिमगौरी आडके, माजी सभागृहनेते दिनकर पाटील , विद्यमान सभागृहनेते कमलेश बोडके व नगरसेवक मुकेश शहाणे यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये शहरामध्ये विविध विकासकामांचे उद्‌घाटन करण्यासंदर्भात, तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीतीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या चर्चेत मागे भाजपमधील अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचेदेखील एक चर्चेचा सूर आहे.

bjp
आरटीओ गैरव्यवहारप्रकरणी सर्वांना क्लीन चिट
bjp
डोंगरगावच्या तरुणाच्या हाती गुजरातमधील व्हीव्हीआयपी सुरक्षा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.