नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हा जाहीर होणार, याविषयी उत्सुकता वाढत असताना मंगळवारी (ता. २३) केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
या पत्रानुसार १६ एप्रिलला राज्यात निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात येते. २०१४ व २०१९ या दोन्ही वेळी लोकसभेच्या निवडणुका एप्रिल महिन्यात झालेल्या आहेत. त्यामुळे या पत्रात नावीन्य नसल्याचे कळल्यानंतर नागरिकांची निराशा झाली. (Excitement with viral letter of Election Commission Nashik Political News)
केंद्रीय निवडणूक आयोगाने थेट निवडणुकीची घोषणा केली की आचारसंहिता लागू होते. विकासकामांना ‘ब्रेक’ लागतो आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरू होते. लोकसभा निवडणुकीची घोषणा कुठल्याही क्षणी होईल, असे वातावरण सध्या निर्माण केले जात आहे.
त्यातही ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा नारा दिला जात असल्याचीही जोरदार चर्चा आहे. पण निवडणूक आयोगाच्या व्हायरल पत्रामुळे पूर्वनियोजित वेळेनुसारच निवडणुका होतील, असे स्पष्ट होते.
यापूर्वीच्या दोन्ही पंचवार्षिक निवडणुका या एप्रिलमध्येच झालेल्या आहेत. त्यात नावीन्य तर नाहीच शिवाय निवडणुका अलीकडे घेतल्या जातील, अशा शंकेलाही आता वाव उरलेला नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.