NMC News: मोहिमेतून 5103 भूखंडांची दुहेरी कराच्या जाचातून सुटका

थकबाकीतील ४९ कोटींची रक्कम वजा होणार
NMC News
NMC News esakal
Updated on

NMC News : मोकळे भूखंड असताना लागू झालेला कर व त्याच भूखंडावर इमारत उभी राहिल्यानंतरदेखील लागू झालेला कर, अशा दुहेरी करातून सुटका करण्यासाठी महापालिकेच्या विविध कर विभागाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेत ५१०३ भूखंडांची दुहेरी कराच्या जाचातून सुटका झाली आहे.

या माध्यमातून थकबाकीमध्ये दिसत असलेली ४९ कोटींची रक्कमदेखील वजावट होणार असल्याने थकबाकीचा आकडादेखील महापालिकेच्या दप्तरी कमी होणार आहे. (Exemption of 5103 plots from double taxation probe NMC News nashik)

उत्पन्नात वाढ करण्यासाठी महापालिकेकडून मोकळ्या भूखंडावरदेखील कर लावला जातो. कर लावल्यानंतर वसुलीची प्रक्रिया सुरू राहते, मात्र ज्या मोकळ्या भूखंडावर कर लागू होतो. त्याच मोकळ्या भूखंडावर इमारत किंवा बंगला उभा राहिल्यास घरपट्टीच्या माध्यमातूनदेखील कर लागू होतो.

नियमाप्रमाणे एकाच मिळकतीवर दोन कर महापालिकेला घेता येत नाही व संबंधित मिळकत धारकानेदेखील एकच कर अदा करायचा असतो. मात्र महापालिकेकडून दोन्ही कर भरण्यासाठी नोटिसा पाठवल्या जात असल्याने नागरिकांना दुहेरी कराचा सामना करावा लागत होता.

मात्र, उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दुहेरी कर असलेल्या मिळकतींवर एकेरी कर लावण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने महापालिकेकडे असलेल्या ३१ हजार १६३ इमारतींवरचा दुहेरी कराचा बोजा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याअनुषंगाने १५ जुलैपर्यंत मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनादेखील स्वतःहून पुढे येऊन दुहेरी कर रद्द करण्यासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
Nashik Igatpuri Tourism: निसर्गसौंदर्याने बहरला इगतपुरी तालुका! हिरवागार शालूने खुलला कसारा घाट

त्याला प्रतिसाद मिळून ५१०३ मोकळ्या भूखंडावरील दुबार करांची आकारणी रद्द करण्यात आली आहे. दुपार करांची वजावट करण्यात आल्याने थकबाकी दिसत असलेल्या एकूण रक्कमेमधून ४९ कोटी रुपयांच्या थकबाकीची वजावट होणार आहे.

मोहीम सुरूच राहणार : पवार

शहरात ३१,१६३ मोकळ्या भूखंडावर दुहेरी कार्याची आकारणी केली जात होती. यातील ५१०३ मोकळ्या भूखंडावरील दुबार कर आकारणी रद्द करण्यात आली आहे.

सातपूर, नाशिक रोड, पूर्व सिडको तसेच पश्चिम विभागात पहिल्या टप्प्यात दुबार कर आकारणीचा बोजा रद्द करण्यात आला असून, सदर मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती विविध विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिली.

NMC News
Crop Insurance: वनहक्क जमीनधारकांना पीकविम्याचा लाभ! राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.