Nashik News: पेठ रोडचा वनवास संपता संपेना! संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त

Rau Hotel to Tavali Fata road is in bad shape, dust is flying in the area and women are sitting in shops with handkerchiefs tied around their mouths due to this.
Rau Hotel to Tavali Fata road is in bad shape, dust is flying in the area and women are sitting in shops with handkerchiefs tied around their mouths due to this.esakal
Updated on

Nashik News : सततच्या दुरवस्थेमुळे कायम चर्चेत असलेला पेठ रोडवरील राऊ हॉटेल ते तवली फाटा रस्ता प्रशासकीय कार्यकाळात जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आला. मात्र जून महिन्यात पडलेल्या पहिल्या पावसात या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले.

सप्टेंबरमध्ये शहरात पडलेल्या संततधार पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडल्याने स्थानिक नागरिकांना धुळीचा आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असून यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटत आहे. (exile of Peth Road never ends Dust reigns entire area citizens suffer Nashik News)

गेल्या वर्षी नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी तीन ते चार वेळेस आंदोलन केले होते. आंदोलनानंतर आंदोलक आणि महापालिका शहर अभियंता यांच्यात पोलिसांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात बैठक पार पडली होती.

त्यानंतर महापालिका बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविली. सदर कामासाठी ज्या ठेकेदाराला काम दिले होते, त्या ठेकेदाराने सहा ते आठ महिन्यांपूर्वीच रस्त्यावरील खड्डे बुजवत काम पूर्ण केले होते.

परंतु सप्टेंबरमध्ये संततधार पावसामुळे रस्त्यावर नवीन तर जूनमध्ये बुजविले खड्डे पुन्हा एकदा दिसू लागले. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालक खड्डे वाचवत वाहन चालवत आहे.

दरवेळी पावसामुळे जर असे बुजवलेले खड्डे पुन्हा दिसत असतील तर ठेकेदाराने कशा पद्धतीचे काम केले याची चौकशी करत ठेकेदारावर तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Rau Hotel to Tavali Fata road is in bad shape, dust is flying in the area and women are sitting in shops with handkerchiefs tied around their mouths due to this.
NMC Smart School: डिजिटल शिक्षणासाठी मनपा विद्यार्थी सज्ज; स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे दिवाळीनंतर उद्‌घाटन

हाताची घडी, तोंडावर बोट...

गेली अनेक वर्ष सातत्याने नादुरुस्त असणारा पेठ रोड रस्ता दुरुस्तीसाठी अनेक जण आंदोलने झाली. अनेक लोकप्रतिनिधी, आमदार, पालकमंत्री यांनी त्याच्या दुरुस्ती व काँक्रिटकरणाची स्मार्ट सिटी मार्फत केली जाणार असल्याच्या घोषणा देखील केल्या.

मात्र परिस्थिती जैसे थे आहे. दर वेळी फक्त दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांची उड्डाणे घेणाऱ्या मनपा बांधकाम विभागाच्या किरकोळ दुरुस्तीनंतर या रस्त्यासाठी आम्ही प्रयत्न केला असे म्हणून घेणारे लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची मात्र ठेकेदारासमोर मात्र हाताची घडी, तोंडावर बोट अशी परिस्थिती दिसून येते.

"परिसरातील लोकप्रतिनिधी तसेच महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली असता लवकरच रस्त्याचे काँक्रिटकरण केले जाणार असल्याचे उत्तर गेल्या अनेक महिन्यापासून मिळते. मात्र प्रत्येक्षात मात्र खड्डे देखील व्यवस्थित बुजविले जात नाही. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असून अधिकारी त्यास पाठीशी घालत आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी."- अमन देवरे, स्थानिक रहिवासी

"आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छोटेसे दुकान सुरू केले आहे. परंतु रस्त्यावरील धुळीमुळे दुकानात विक्रीसाठी आणलेल्या मालावर धुळीचे थर जमा होत आहे. त्यामुळे वस्तू घ्यायला येणारे ग्राहक मालावरील धुळ बघून परत निघून जातात. महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावे व त्वरित रस्त्याचे दुरुस्ती करावी."- कल्पना चव्हाण, व्यावसायिक

Rau Hotel to Tavali Fata road is in bad shape, dust is flying in the area and women are sitting in shops with handkerchiefs tied around their mouths due to this.
NMC News: अतिक्रमण मोहिमेतील जप्त साहित्याचा लिलाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.