Nashik News: आसनगाव- ठाणे महामार्गाचे विस्तारीकरण तातडीने करा; मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचना

eknath shinde
eknath shindeesakal
Updated on

Nashik News : नाशिकहून मुंबईकडे जाताना कल्याण फाटा ते ठाण्याच्या खाडीपर्यंत महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने तासनतास वाहने खोळंबून राहतात. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबरअखेर रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे महामार्ग विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याची सूचना केली त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली आहे. (Expand Asangaon Thane highway urgently Instructions of Chief Minister Shinde Nashik News)

नाशिकहून मुंबईला जाताना कल्याण फाट्यापर्यंत अवघ्या पावणेदोन तासात पोचता येते, मात्र त्यापुढे कल्याण फाटा ते ठाण्याच्या खाडीपर्यंत सातत्याने वाहतूक ठप्प होत असल्याने तेवढे अंतर पार करण्याकरिता दोन ते अडीच तास लागतात.

अंजुर फाटा तसेच कल्याण फाटा व आसनगाव येथे समृद्धी महामार्गाचाच भाग असलेल्या रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. सदर काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नाशिककरांना रस्त्याने मुंबईचा प्रवास वेळेच्या व आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही.

वास्तविक नाशिक ते मुंबईचा प्रवासा अवघे तीन ते साडेतीन तासाचा असताना आसनगाव ते ठाणे दरम्यान सुरू असलेल्या महामार्ग विस्तारीकरण कामामुळे पाच ते साडेपाच तासांचा प्रवास होतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

eknath shinde
NMC News: मोहिमेतून 5103 भूखंडांची दुहेरी कराच्या जाचातून सुटका

नाशिककरांप्रमाणेच कल्याण-भिवंडी ठाण्याच्या नागरिकांनादेखील या वाहतुकीचा फटका बसतो. त्यामुळे महामार्गाचे विस्तारीकरण काम तातडीने करण्याची मागणी होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार घेतल्यानंतर पालकमंत्री भुसे यांनी तातडीने महामार्ग विस्तारीकरण करण्याचे काम व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

महामार्गाची दुरुस्ती

मुसळधार पावसामुळे नाशिक ते मुंबई दरम्यानच्या रस्त्यांची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याचे डागडुजी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांची गती संथ झाली आहे.

eknath shinde
Nashik News: राज्यातील सिमेंट नाला बांधातील गाळ काढण्यासह नाला खोलीकरणास मान्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.