नाशिक : सिडकोमध्ये दिवसेंदिवस घरांचा प्रश्न बिकट होत चालला आहे. कुटुंबाचे देखील विभाजन होत असल्याने आहे, त्याच घरावर मजले चढविणे किंवा मागे-पुढे घराचा विस्तार करून निवासाची व्यवस्था केली जात आहे. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सिडकोच्या ज्या घरांमध्ये सध्या नागरिक वास्तव्य करीत आहे, ती घरी ९९ वर्षे कराराने आहे, ही गोष्ट अद्यापही अनेकांना माहीत नाही त्यामुळे अस्तित्वात असलेली घरे फ्री होल्ड करून वास्तव्य करणाऱ्यांच्या नावे करणे गरजेचे झाले आहे. (Expectations from Guardian Minister Dadaji Bhuse will make House Freehold in cidco Nashik Latest Marathi News)
शहराचा विस्तार होत असताना सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या सिडको विभागामार्फत घरकुल योजना राबविण्यात आली. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांसाठी ही योजना होती. आतापर्यंत सिडकोच्या एक ते सहा अशा स्कीम झाल्या असून त्यात एकूण २८ हजार सदनिका आहे. सिडकोची घरे बांधली त्यावेळी घरांचा आकार एकसारखा होता.
सिडकोसाठी असलेल्या नियमावलीत अर्धा एफएसआय शासनाने देऊ केला. सिडकोच्या एक ते चार स्कीम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना घरांचे वाटप करण्यात आले. साधारण १५ वर्षापर्यंत सिडकोच्या घरांमध्ये फारसे फेरफार केले जात नव्हते. मात्र कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढली त्यानुसार जागा देखील कमी पडू लागल्याने अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे सिडकोतील घरांच्या मागे व पुढे असा विस्तार होत असताना तिसऱ्या मजल्यापर्यंत देखील घरांची उंची वाढविण्यात आली.
सिडकोतील घरांच्या मागच्या बाजूला ड्रेनेजच्या लाईन टाकण्यात आलेल्या आहेत. त्यावर देखील आता घरी उभारली आहे. त्यामुळे भविष्यात ड्रेनेजचे काम करायचे झाल्यास घरांची देखील तोडफोड करावी लागेल, अशी परिस्थिती आहे. सिडकोत वीज तारांचा देखील एक मोठा प्रश्न आहे. घरांची मजले वाढल्याने विद्युत तारा गॅलरीतून किंवा गच्चीला लागून आहेत. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी पतंग उडताना विजेचा धक्का लागून मृत्यूच्या घटना देखील घडल्या आहेत.
अशा परिस्थितीमध्ये सिडकोतील घरांच्या बाबतीत नव्या पिढीला अद्यापही काही तांत्रिक गोष्टी माहिती नाही. सिडकोतील घरे ९९ वर्षे कराराची आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे फ्री होल्ड करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. घरे फ्री होल्ड करून मालकी हक्काने कायमस्वरूपी मिळवून देण्याची जबाबदारी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९९ वर्षे कराराने दिलेल्या सिडकोतील सदनिका फ्री होल्ड करण्याची घोषणा केली होती मात्र अद्यापही त्यावर कारवाई झाली नाही.
"सिडकोतील घर ९९ वर्षे कराराने असले तरी अनेक वर्षांपासून नागरिक राहत असल्याने त्यांचा मालकी हक्क प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे कायदेशीर रित्या शासनाने प्रयत्न करून घरे फ्री होल्ड करावी." - पांडुरंग खालकर, जुने सिडको.
"अनेक वर्षांपासून आम्ही सिडकोच्या घरामध्ये राहतो. आता कुटुंबाच्या सदस्यांची संख्या वाढल्याने घरांचा विस्तार करणे गरजेचे आहे. शासनाने घरे नावावर करून द्यावी."
- साधना पाटील, त्रिमूर्ती चौक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.