मंत्रीपद मिळूनही डॉ. भारती पवारांचा सोज्वळपणा कायम

Bharati Pawar
Bharati PawarGoogle
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : एखादा कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य जरी झाला तरी पदाची हवा डोक्यात जाते. हुरळून जात आपण वेगळे असल्यासारखे भासवितो. पण, एखादी महिला केंद्रीय राज्यमंत्री होऊन सुद्धा साधे, सोज्वळपणाचे दर्शन वागण्या - बोलण्यात दिसते, तेव्हा आश्‍चर्य वाटणारच. पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय मंत्रीपदाला गवसणी घालणाऱ्या आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यात पदाचा कोणताही ॲटीट्यूड दिसला नाही. मंत्रीपदाचा तामझाम बाजूला ठेवत दुपारच्या भोजनानंतर जेवणाचे ताट स्वत: उचलले. कार्यालयात प्रवेश करताना पायातील चप्पल काढून नतमस्तक झाल्या. दिडोंरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारताना तुमच्यामुळे इथपर्यंतचा प्रवास झाला, अशा शब्दांत कृतज्ञतेच्या भावनांना त्यांनी वाट मोकळी करून दिली. Experience of Nashik party workers about MP Dr. Bharti Pawar


निवडणुकीत विजय मिळविला की त्या नेत्याला परिश्रम घेणारे कार्यकर्ते, मतदारांचा विसर पडतो. पण, मंत्रीपद मिळूनही पाय जमिनीवर असणारे व्यक्ती विरळच असतात. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या डॉ. भारती पवार यांच्या स्वभावात जराही बदल न झाल्याचे नाशिकच्या कार्यकर्त्यांनी अनुभवले. बुधवारी (ता. ७) सायंकाळी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रात्री उशीरापर्यंत विविध पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे येणाऱ्या शुभेच्छाचा स्विकार केला.

कार्यालयाबाहेर काढली चप्पल…

मंत्रीपदाच्या पहिल्याच दिवशी त्याचा साधेपणा कायम असल्याचे नाशिकवरून शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी पाहिले. गुरूवारी (ता. ८) सकाळी दहाला दिल्लीच्या राजपथ मार्गावरील केंद्रीय निर्माण भवतील राज्य आरोग्यमंत्र्याच्या कार्यालयात पोहचल्या. प्रवेश करण्यापूर्वीच त्या पायरीला नतमस्तक झाल्या. चप्पल बाहेर काढून त्यांनी आत प्रवेश केला. त्यावेळी स्वागताला आलेले कार्यालयातील अधिकारीही अवाक्‌ झाले. भाजपचे पदाधिकारी बापूसाहेब पाटील, सतीश मोरे, नरेंद्र जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा साधेपणा प्रत्यक्ष अनुभवला. पदभार स्विकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी डॉ. पवार यांना आसनस्थ होण्याचा आग्रह केला. तुम्ही उभे आणि मी बसयाचे, हे योग्य नाही. तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोहचले. अगोदर तुम्ही समोरील खुर्चीवर बसा, अशी गळ मंत्री डॉ. पवार यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना घातली.
दुपारी १ ते ३ पर्यंत आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तीन वाजता खासदार निवासस्थानी जेवणाला आल्या. भोजनानंतर टेबलावरील ताट स्वत: उचलून किचनमध्ये नेल्याचे पाहून भाजप कार्यकर्ते अंचबित झाले. दुपारी चारला पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या नवनियुक्त मंत्र्यांच्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्या. तेथे मोदी यांनी जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पदाचा वापर करा, मंत्रीपदाला न्याय न दिल्यास ते काढून घेण्याचा इशाराही या वेळी मिळाला. १५ ऑगस्टपर्यंत दिल्ली न सोडण्याच्या सूचना मोदी यांनी नव्या मंत्रीमंडळाला दिल्याचे समजते.

Bharati Pawar
पावसाच्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

पंतप्रधान मोदी यांच्याकडील बैठक रात्री नऊ वाजता संपल्यानंतर निवासस्थानी येताच मंत्री डॉ. भारती पवार यांचे कार्यकर्त्यांनी ढोलताशा, फटाक्याची आतीषबाजी व जयघोष करीत उत्साहात स्वागत केले. कार्यकर्त्यांनी आणलेली गांधी टोपी परिधान करीत डॉ. पवार या आनंदोत्सवात सहभागी झाल्या. या वेळी भाजपचे पदाधिकारी बापूसाहेब पाटील, सतीश मोरे, नरेंद्र जाधव, विनायक शिंदे, अमर राजे, नितीन गायकर, योगेश तिडके, रवी गांगुर्डे, योगेश चौधरी, नितीन जाधव, रामेश्‍वर ढोमसे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्रीपदाचा मान मिळूनही एवढ्या साधेपणाने वावरण्याला प्रगल्भता लागते. खासदार अन्‌ आता मंत्री झाल्यानंतरही डॉ. भारती पवार यांच्या स्वभावात जराही बदल झाला नाही. हे आम्ही दोन दिवस प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवले. मंत्री डॉ. पवार यांच्या माध्यमातून दिंडोरी मतदारसंघात विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही.

- बापूसाहेब पाटील, प्रदेश चिटणीस, भाजप किसान मोर्चा

कोणतेही पद कायमस्वरूपी नसते. त्यामुळे वेगळेपण दाखविण्याचा माझा स्वभाव नाही. मिळालेल्या संधीचा जनसामान्यांसाठी उपयोग करणे, याला मी प्राधान्य देते. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य देणार आहे.

- डॉ. भारती पवार, केंद्रीय राज्य मंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण

Bharati Pawar
मोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()