Nashik News: सिमेंटशिवाय काँक्रिटीकरणाचा प्रयोग यशस्वी! भारतातील पहिलाच प्रयोग नाशिकमध्ये

ब्लॉस्ट फर्नेसमधील स्लगचा प्रभावी वापर
Sourav Rakshit attending the cementless concreting ceremony by Mahindra Logistics and JK Ware Housing
Sourav Rakshit attending the cementless concreting ceremony by Mahindra Logistics and JK Ware Housingesakal
Updated on

Nashik News : जगभरात कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या उद्देशाला धरून अनेक प्रयोग केले जात आहेत. ‘ग्रीन बिल्डिंग’ची संकल्पना सर्वच क्षेत्रांत आता रुजायला लागली आहे.

त्याच संकल्पनेला अनुसरून महिंद्र लॉजिस्टिक्स लिमिटेड व जेके वेअर हौसिंग प्रा. लि. यांनी संयुक्तपणे सिमेंटशिवाय काँक्रिटीकरण करून एक क्रांतिकारी प्रयोग यशस्वी केला आहे.

नाशिकमधील बेळगाव ढगा येथील ज्येष्ठ उद्योजक तथा माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्या जेके वेअर हाउसमध्ये हा प्रयोग करण्यात आला. (Experiment of concreting without cement successful First experiment in India Effective utilization of slug from blast furnace in Nashik)

स्टील उत्पादन करणाऱ्या उद्योगांना ब्लास्ट फर्नेसमधून निघणाऱ्या स्लॅगची विल्हेवाट लावणे, हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत जिकिरीचा विषय आहे. स्लॅग आणि सिमेंटचे गुणधर्म सारखेच आहेत. स्लॅगमध्ये काही प्रमाणात ऍक्टिवेटर्स टाकून मिश्रण तयार केले जाते.

हे मिश्रण सिमेंटपेक्षाही अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. टाटा स्टील लिमिटेड व इको मटेरिअल्स यांनी संयुक्तपणे हे मिश्रण तयार केले. त्याचे पेटंटही प्राप्त झाले आहे. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

महिंद्र लॉजिस्टिक्स लिमिटेडचे प्रतिनिधी सौरव रक्षित, विश्वास जाधव, पंकज रास्ते, अभिजित बिस्वास, नवोदय सायन्सचे डॉ. रामकुमार नटराजन, एन. वरदराजन, जेके वेअर हौसिंगचे संचालक शशिकांत जाधव, शंतनू जाधव, शुभम जाधव उपस्थित होते. अमित पाटील, महेश सारंगधर तसेच विराज इंफ्राटेकचे अभिजित बनकर यांनी तांत्रिक सहाय्य केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sourav Rakshit attending the cementless concreting ceremony by Mahindra Logistics and JK Ware Housing
MVP Annual Meeting : आर्थिक शिस्‍तीतून ‘मविप्र’ची शाश्‍वत वाटचाल : ॲड. ठाकरे

"पर्यावरणपूरक वेअर हाउस बांधण्यावर भर असून, महिंद्र लॉजिस्टिक्स लिमिटेडने २०४० पर्यंत कार्बन उत्सर्जनमुक्त कंपनी बनण्याचा निश्चय केला आहे. त्याच अनुषंगाने आम्ही नवनवीन संकल्पना राबवत आहोत." - सौरव रक्षित, महिंद्र लॉजिस्टिक

"वेळेसह नैसर्गिक संपदेची बचत होणार असून, २०१३ पासून दरवर्षी वेगळी संकल्पना राबवून नावीन्यपूर्ण प्रकल्प उभे करीत आहोत. बांधकाम क्षेत्रात हा एक क्रांतिकारी प्रयोग ठरेल, यात शंका नाही." - शशिकांत जाधव, संचालक जेके वेअर हाउस

"नाशिकमधील या अनोख्या प्रयोगाने १७६ टन कार्बन उत्सर्जन रोखण्यात यश आले. भारतभर असे प्रयोग झाल्यास खूप मोठी नैसर्गिक बचत होणार आहे."

- डॉ. रामकुमार नटराजन, नवोदय सायन्स

Sourav Rakshit attending the cementless concreting ceremony by Mahindra Logistics and JK Ware Housing
SAKAL Exclusive: संगणकासह संलग्न शाखांकडेच कल! सिव्हि‍लच्‍या 59 टक्‍के, मॅकॅनिकलच्‍या 48 टक्‍के जागा रिक्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.