Nashik News : मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा घाटाजवळ असलेल्या घाटनदेवी मंदिरासमोरील उंटदरीच्या बाजूला अज्ञाताने मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधे व इंजेक्शन देण्यासाठी वापरणारे सिरींज, कापूस आदींचा साठा सोमवारी (ता. २४) टाकलेला मिळून आला.
या प्रकारामुळे वन्यजीवांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Expired drugs injection in Kasara Ghat Fear of developing health problems Nashik News)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उंटदरीत सहवास करणारी माकडे हे औषधे खात असून, सिरींज घेऊन जात असल्याने मोठा अनर्थ घडून माकडांना इजा होऊ शकते. तसेच, उंटदरीचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करीत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
तसेच, औषधे फेकलेल्या ठिकाणापासूनच जवळ अनेक लहान-मोठे धबधबे आहेत. या धबधब्यांचे पाणी पुढे भातसा नदीच्या पाण्याला जाऊन मिळते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती आहे. राज्यभरातून पावसाळ्यात वीकेंडला हजारो पर्यटक येतात.
पर्यटकांच्या मुख्य ठिकाणीच असे कृत्य कोणी केले, याचा तपास त्वरित होणे अपेक्षित आहे. तसेच, वन्य प्राण्यांना कोणतीही इजा होऊ नये, यासाठी वन विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.