नाशिक : नॅक मुल्यांकनप्राप्त महाविद्यालयांना ॲन्युअल क्वालिटी ॲशुरन्स रिपोर्ट (एक्यूएआर) सादर करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. असे असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ३१ मार्चचा अट्टहास धरला जात असल्याने महाविद्यालये मेटाकुटीला आलेली आहेत.
येत्या शैक्षणिक वर्षात नॅक मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेवर निर्बंध आणले जाणार आहेत. अशात वाढीव मुदतीत एक्यूएआर सादरीकरणाची सवलत मिळण्याची महाविद्यालयांना अपेक्षा आहे. (Extension for pending AQAR From department of higher and technical education however insistence of Marchend Nashik News)
राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेतर्फे (नॅक) १७ फेब्रुवारीला वाढीव मुदतीसंदर्भातील पत्र जारी केले होते. या परिपत्रकात नमूद केल्यानुसार अनेक उच्च शिक्षण संस्था, इन्स्टिट्यूट्सकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार एक्यूएआर सादरीकरणासाठी अंतीम मुदत ३१ मेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
२०१६-१७ ते २०२१-२२ या दरम्यानच्या शैक्षणिक वर्षांच्या अहवाल सादरीकरणासाठी ही वाढीव मुदत असणार आहे. असे असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून यापूर्वीच्या ३१ मार्चच्या डेडलाईनचा आग्रह महाविद्यालये, संस्थांकडे धरला जात आहे.
सध्या सर्वत्र परीक्षांची लगबग सुरु असताना, या प्रशाकीय कामामुळे महाविद्यालय प्रशासनांची दमछाक होण्याची शक्यता आहे. त्यामूळे नॅककडून वाढीव मुदतीसंदर्भातील परिपत्रकाची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
‘एक्यूएआर’ आवश्यकच
ॲन्युअल क्वालिटी ॲशुरन्स रिपोर्ट (एक्यूएआर) हा अहवाल नॅक मानांकित महाविद्यालयांना दरवर्षी नॅकला सादर करावा लागतो. ऑनलाइन पद्धतीने निर्धारित संरचनेत हा अहवाल सादर करावा लागतो.
मानांकन दिल्यानंतर संबंधित महाविद्यालयाची प्रगती, सुधारणांचा आढावा घेण्यासाठी हा अहवाल महत्वाचा समजला जातो. २०१९ पासून केवळ ऑनलाइन माध्यमातून अहवाल स्वीकारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.