Course Registration Extension : विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेशासाठीची प्रक्रिया सध्या सुरु आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सुरू असलेल्या या प्रक्रियेत विविध अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार वाढीव मुदतीत पात्रताधारक विद्यार्थ्यांना नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध असणार आहे. (Extension of admission registration for degree and post graduate courses nashik news)
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रवेशाची सध्या प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी विविध अभ्यासक्रमांसाठी एक किंवा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये सीईटी परीक्षांचे आयोजन केले होते. या परीक्षांचा निकाल जाहीर केल्यानंतर आता पुढील प्रवेश प्रक्रियेत सहभागासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.
सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती दाखल करून संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी करायची आहे. पुढील टप्यांत कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. यासाठी ई-स्क्रुटीनी व प्रत्यक्ष स्क्रुटीनी असे दोन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नोंदणीकृत विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार आहे. सध्या नोंदणी प्रक्रिया सुरु असल्याने अभ्यासक्रमनिहाय प्रवेश फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक टप्याटप्याने जाहीर केले जाणार आहे. तत्पूर्वी तात्पुरती व अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.
वाढीव मुदतीनुसार अभ्यासक्रम नोंदणीची मुदत
वाढीव मुदतीनुसार अभियांत्रिकी (बीई/बी.टेक), एमसीए, एम.आर्क., बी. पी.एड. या अभ्यासक्रमाच्या नोंदणीला १० जुलैपर्यंत मुदत वाढविली आहे. तर एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीसाठी १४ जुलै अशी वाढीव मुदत आहे.
नियमित वेळापत्रकानुसार बी. एड. आणि एम.एड. या अभ्यासक्रमांसाठी १० जुलै, तसेच एम.ई./एम.टेक अभ्यासक्रमासाठी ९ जुलै, एमएचएमसीटी अभ्यासक्रमासाठी ९ जुलै अशी नोंदणीची मुदत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.