Nashik Phalke Smarak: फाळके स्मारक पुनर्विकास सल्लागार नियुक्तीस मुदतवाढ

Dadasaheb Phalke Smarak, Nashik
Dadasaheb Phalke Smarak, Nashikesakal
Updated on

Nashik Phalke Smarak : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या पुनर्विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीकरीता निविदा सादर करण्यास एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

महापालिकेकडून पांडव लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेत दादासाहेब फाळके स्मारक उभारले आहे. (Extension of appointment of Phalke Smarak Redevelopment Consultant nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सुरवातीला स्मारकातून महापालिकेला फायदा झाला, परंतु प्रकल्पाच्या सेवांचे खासगीकरण करण्यात आल्याने पांढरा हत्ती पोसण्यासारखी अवस्था झाली. २४ वर्षात स्मारकावर बारा कोटी रुपये खर्च झाले आहेत.

भाजपच्या सत्ताकाळात महापौर असताना सतीश कुलकर्णी यांनी स्मारकाच्या पुनर्विकासाची योजना आखली. त्यासाठी खासगीकरणाचा पर्याय स्वीकारण्यात आला. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेला परवडणार नसल्याचे कारण देत विरोध केला.

Dadasaheb Phalke Smarak, Nashik
NMC Fireman Recruitment: विद्यावेतनावर 90 फायरमनची भरती

त्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र त्यांची बदली झाली. पर्यटन विभागाकडून ४० कोटी रुपयांचा निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला.

बांधकाम विभागाने प्रकल्प सल्लागार नियुक्तीसाठी निविदा काढून स्वारस्य देकार मागविले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. सल्लागार नियुक्तीला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली.

निविदेतील अटी- शर्थी दुरुस्त करून फेरनिविदा काढण्यात आल्या. मात्र सणासुदीचे कारण देत फेरनिविदेला आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.

Dadasaheb Phalke Smarak, Nashik
NMC News: शहराची लोकसंख्या साडेबावीस लाख; पाणीगळती 28 टक्क्यांवर! अडीच लाख तरल लोकसंख्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.