HSC Exam Form : बारावी परीक्षेच्या फॉर्मसाठी 25 नोव्‍हेंबरपर्यंत मुदतवाढ

ssc hsc exam latest marathi news
ssc hsc exam latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : बारावीच्‍या फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरले जात असून, संकेतस्‍थळात उद्‌भवलेल्‍या तांत्रिक अडचणीमुळे नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांचे २५ नोव्‍हेंबरपर्यंत फॉर्म भरता येतील. (Extension of date for 12th exam form till 25th November Nashik News)

ssc hsc exam latest marathi news
Nashik : कार्यकारी अभियंता कंकरेज अखेर सक्तीच्या रजेवर; ZP CEOनी काढले आदेश

महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सूचनापत्र जारी केलेले आहे. त्‍यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२३ च्‍या परीक्षेचे फॉर्म भरण्याची मुदत मंगळवार (ता. १५) पर्यंत दिलेली होती. परंतु संकेतस्‍थळात काही तांत्रिक बिघाड झाल्‍याने सुमारे चार ते पाच दिवस बारावीचे आवेदनपत्र ऑनलाइन पद्धतीने भरता येत नव्‍हते. त्‍यामुळे नियमित शुल्‍कासह आवेदनपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली जात आहे.

व्‍यावसायिक अभ्यासक्रम शाखांचे, नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषयक घेऊन प्रविष्ट होऊ इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म दाखल करता येतील. नियमित शुल्‍कासह २५ नोव्‍हेंबरपर्यंत, तर विलंब शुल्‍कासह २६ ते ३० नोव्‍हेंबरदरम्‍यान ऑनलाइन फॉर्म दाखल करता येतील. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्‍क बँकेत भरण्याची मुदत २ डिसेंबरपर्यंत असेल व यानंतरच्‍या टप्प्‍यात ७ डिसेंबरपर्यंत शुल्‍क भरण्याचा तपशील, विद्यार्थ्यांची यादी व अन्‍य आवश्‍यक माहिती विभागीय मंडळाकडे सादर करायची आहे.

ssc hsc exam latest marathi news
Bhagat Singh Koshyari | मंत्र्यांनी कामे न झाल्यास थेट माझ्याकडे या : भगतसिंह कोश्यारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.