MHT-CET Exam : इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व बी. एस्सी. (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षास प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.
त्यानुसार येत्या गुरुवार (ता. २०)पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहे. (Extension of MHT CET exam application till tomorrow nashik news)
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी होत असलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेच्या नोंदणीत पहिल्या टप्यात नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची संधी दिलेली होती. यानंतर पुढील टप्यात पाचशे रुपये विलंब शुल्क आकारुन नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली होती.
ही मुदत संपलेली असली, तरी काही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहाण्याची शक्यता लक्षात घेता, नोंदणीची आणखी एक संधी देण्यात आली आहे. त्यानुसार येत्या गुरुवारपर्यंत पाचशे रुपये विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
निर्धारित शुल्क अदा करण्यासाठी शुक्रवार (ता. २१)पर्यंत मुदत आहे. मेमध्ये परीक्षा होणार असून, पीसीएम आणि पीसीबी अशा दोन ग्रुपमध्ये स्वतंत्ररित्या ही परीक्षा घेतली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.