Crime Update : मिठाईत झुरळ टाकून उकळली खंडणी; CCTVमुळे पोलखोल

crime news
crime news esakal
Updated on

नाशिक : स्वीट मार्टमध्ये मिठाई खरेदीच्या बहाण्याने जायचे आणि मिठाईत झुरळ टाकून त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत शहरातील दोघा मिठाई विक्रेत्यांकडून खंडणी वसुल करणाऱ्या खंडणीखोराविरोधात गंगापूर व सरकारवाडा पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दरम्यान, असे प्रकार घडले असल्यास तात्काळ पोलिसांकडे संपर्क साधण्याचेही आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. खंडणीसाठी संशयिताने वापरलेली शक्कलीचे मिठाई विक्रेत्यानेच भांडाफोड केल्याने सदरचा प्रकार समोर आला आहे. (Extortion by putting cockroach in sweets crime revealed due to CCTV Nashik Crime Update Latest Marathi News)

अजय राठोड उर्फ अजय राजे ठाकूर असे संशयित खंडणीखोराचे नाव आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात पहिली घटना घडली. रतन पुनाजी चौधरी (रा. नयनतारा एम्पायर, लवाटेनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल येथे सागर स्वीट हे मिठाई विक्रीचे दुकान आहे. गेल्या १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी संशयित अजय राठोड हा बासुंदी खरेदी करण्यासाठी दुकानात आला.

मात्र बासुंदीमध्ये झुरळ असल्याचे सांगून त्याने त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, सदरचा प्रकार अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्याचीही धमकी दिली. तसे करायचे नसेल तर त्याने एक लाखांच्या खंडणीची मागणी केली. सदरील खंडणीची रक्कम त्याने २० ऑगस्ट रोजी सागर स्वीटच्या ऑफिसमध्ये घेतली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक पाटील हे तपास करीत आहेत.

दरम्यान, संशयिताने आधीचीच शक्कल सावरकर नगरमधील मधुर स्वीटस्‌मध्येही वापरली. मनिष मेघराज चौधरी (रा. मनिष प्लाझा, पाईपलाईन रोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संशयित अजय राजे ठाकूर हा मधुर स्वीटमध्ये रबडी खरेदी करण्यासाठी आला.

त्यावेळी त्याने रबडीमध्ये झुरळ असल्याचे सांगून त्याचा व्हिडिओ केला आणि पूर्वीप्रमाणेच धमकावत स्वीट मार्टचे मॅनेजर पुखराज चौधरी खंडणीची मागणी केली. त्यासाठी संशयिताने ७ ते १२ सप्टेंबर दरम्यान अजय राजे ठाकूर या नावाच्या मोबाईल क्रमांकारून (९७६७८७७०२४) व्हॉटसॲप कॉल, मेसेज करून सदरचा व्हिडिओ व्हायरल करण्याची व अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्याची धमकी दिली.

crime news
Nashik : वाट चुकलेल्या महिलेची पोलिसांकडून मूळ गावी रवानगी

सदरचे प्रकरण मिटविण्यासाठी त्याने ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणीही केली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक सूर्यवंशी हे तपास करीत आहेत.

सीसीटीव्हीमुळे पोलखोल

सावरकर नगरच्या मधुर स्वीटमध्ये खंडणीखोराने केलेला प्रकार दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. मनिष चौधरी यांनी सदरच्या घटनेनंतर दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात संशयितानेच स्वीटमध्ये झुरळ टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी गंगापूर रोड पोलिसात धाव घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांची भेट घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

"संशयित अजय ठाकूर उर्फ राठोड याचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध सुरू आहे. अशाप्रकारे जर आणखी मिठाई विक्रेत्यांकडे खंडणीची मागणी केली असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी."

- रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर पोलीस ठाणे.

crime news
Crime Update : मुले पळविणारे समजून ब्लँकेट विक्रेत्यांना बेदम मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()