Nashik Crime News : बेरोजगार मित्राने उकळली मैत्रिणीकडून खंडणी; मुंबई नाका पोलिसात गुन्हा

मुंबई नाका पोलिसात संशयित युवकाविरोधात खंडणीची गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पसार झाला आहे.
crime
crimeesakal
Updated on

Nashik Crime News : शाळेत शिकत असल्यापासूनच्या ओळखीच्या संशयित मित्राने इंजिनिअर मैत्रिणीला बदनामी करण्याची धमकी देत वारंवार पैशांची मागणी करीत तिच्याकडून ४० लाखांची खंडणी उकलळी आहे.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात संशयित युवकाविरोधात खंडणीची गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पसार झाला आहे. (Extortion from girlfriend extorted by unemployed friend nashik crime news)

अभिजित नरेंद्र आहिरे (३१, रा. गोविंदनगर, मुंबई नाका) असे संशयित युवकाचे नाव आहे. संशयित युवकाकडून वारंवार होणार्या पैशांच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या पीडित युवतीने अखेर मुंबई नाका पोलिसात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांनी पोलिस निरीक्षक पंकज सोनवणे यांना तपासाचे निर्देश दिले आहेत.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, पीडिता व संशयित अभिजित हे गोविंदनगर परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होते. शिक्षण सुरू असतानाच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. पीडितेने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत नोकरीला लागली आहे. तर संशयित अभिजित हा बेरोजगार आहे. मात्र दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.

crime
Nashik Crime News : शहर, परिसरातून 75 हजाराचा गुटखा जप्त; 5 जणांना अटक

संशयित अभिजित याने पीडिता नोकरीला असल्याने, याच संधीचा गैरफायदा घेत त्याने पीडितेकडे गरिबी व अन्य कारणाने पैसे उकळले. नंतर-नंतर संशयिताकडून वारंवारच पैशांची मागणी करू लागला. एवढेच नव्हे तर पीडितेशी असलेल्या प्रेमसंबंधातून काढलेले फोटो मॉर्फ करून ते नातलगांमध्ये व्हायरल करण्याचे धमकी देत पुन्हा पैशांची मागणी केली.

पीडितेनेही समाजात बदनामीच्या भितीने संशयिताला पैसे दिले. पीडितेने अनेकदा कर्ज काढून संशयिताला कधी रोख स्वरुपात तर कधी ऑनलाईन पैसे दिले. अशारितीने संशयिताने आत्तापर्यंत ४० लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आखातात

दरम्यान, संशयित अभिजित याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी तो आखाती देशामध्ये असल्याची शक्यता पीडितेने वर्तविली आहे. संशयित अभिजितचा पोलीस शोध घेत असून, गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पंकज सोनवणे हे करीत आहेत.

crime
Nashik Crime News : घोटीतील ‘त्या’ खुनाचा 12 तासांत उलगडा; मित्राच्या मदतीने पतीचा घात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()