नाशिक : श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त लाखो वारकरी त्र्यंबकेश्वर याठिकाणी श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत आहे.
पायी दिंडी आधीच त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असल्यातरी बुधवारी (ता. १८) हजारो भाविक त्र्यंबकेश्वर याठिकाणी दर्शनासाठी जाणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाकडून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. (Extra buses of Citylinc for Nivrittinath Maharaj Yatra Nashik News)
सद्य:स्थितीत सिटीलिंकच्या वतीने तपोवन आगारातून १५ बसेसच्या माध्यमातून १०६ बस फेऱ्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात. तर नाशिकरोड आगारतून १० बसेसच्या माध्यमातून ६० बस फेऱ्या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात.
या नियमित बसफेऱ्यांव्यतिरिक्त त्र्यंबकेश्वर यात्रोत्स्वानिमित्त तपोवन आगारातून ६ बसेसच्या माध्यमातून ४८ तर नाशिकरोड आगारातून ४ बसेसच्या माध्यमातून ३२ अशा एकूण १० जादा बसेसच्या माध्यमातून ८० जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. १८ व १९ जानेवारी असे दोन दिवस जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. जादा बसेस मिळून १८ व १९ जानेवारीला रोज तपोवन आगारातून एकूण २१ बसेसच्या माध्यमातून १५४ बसफेऱ्या तर नाशिकरोड आगारातून १४ बसेसच्या माध्यमातून ९२ बसफेऱ्या नियोजित आहे.
एकूणच दोन दिवसांत रोज २४६ बसफेऱ्या भाविकांच्या सेवेसाठी त्र्यंबकेश्वर मार्गावर कार्यरत असणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या सिटीलिंक बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.