Nashik Eyes Infection : शहरात लहान मुलांचे डोळे येण्याची म्हणजेच डोळ्याच्या आजार होऊ लागला आहे.
याची साथच शहरात सुरु झाली आहे. लहान मुलांना देखील डोळे येत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली आहे. (Eye infection in Malegaon city nashik)
पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन मुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढते. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ पसरत आहे. त्यातच लहान मुलासह मोठ्यांमध्ये देखील डोळे येण्याची साथ पसरत आहे.
पावसाळ्यामुळे डोळ्यांच्या आजारांसह साथीच्या आजाराने देखील डोके वर काढल्याने दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. अनेक विद्यार्थी डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले असल्याने शाळा प्रशासनाकडून अशा विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याचा सल्ला दिला जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ही आहे लक्षणे
डोळ्यांचा रंग लाल, गुलाबी होणे. जळजळ होते, तर खाज सुटते. सकाळी डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे, डोळ्यांतून सारखे पाणी वाहणे.
अशी घ्यावी काळजी
डोळे थंड पाण्याने धुवावे, कुटुंबातील व्यक्तींनी रुमाल, टॉवेल स्वतंत्र वापरावा. सार्वजनिक ठिकाणी स्पर्श करू नये. हात स्वच्छ धुणे, घराबाहेर जाताना गॉगल वापरावा, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, डॉक्टारांच्या सल्यानुसारच औषधे डोळ्यात टाकावी.
"डोळ्यांचा संसर्ग चार- पाच दिवस टिकतो, मग बरा होतो. पण या आजारावर स्वत:च्याच मनाने घरगुती उपाय करू नयेत. वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ला घेऊन औषधोपचार करावा."
- डॉ. जयश्री आहिरे, आरोग्याधिकारी, मनपा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.