Currency Note Press: प्रेसचा चेहरामोहरा लवकरच बदलणार; जपान, ऑस्ट्रियामधून 12 अत्याधुनिक मशिन खरेदी

Currency Note Press
Currency Note Pressesakal
Updated on

Currency Note Press : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयाचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. दोन्ही मुद्रणालयाची स्पर्धा क्षमता आणि कामाचा दर्जेदार होणार आहे. या दोन्ही मुद्रणालयामध्ये अत्याधुनिक मशिनरी येणार आहे.

जपान व ऑस्ट्रियामधून बारा अत्याधुनिक मशिन खरेदी करण्यात येणार आहे. एकूण सुमारे ५५० कोटींच्या या मशिनरी खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. फायनल पर्चेस ऑर्डर देण्यात आली आहे.

अशी माहिती इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी आज ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. (Face of currency note Press to Change Soon Purchase of 12 state of art machines from Japan Austria nashik news)

मशिनरी चालविण्यासाठी कामगार व अधिकाऱ्यांनी परदेशात जाऊन प्रशिक्षणही पूर्ण घेतले आहे. नवीन मशिनरी लवकरच कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर उत्पादन खर्च, श्रम, वेळ, वेस्टेज कमी होऊन क्षमता व दर्जा वाढणार आहे.

या दोन्ही मुद्रणालयातील मशिनरी १९८०-८५ सालच्या असून रात्रंदिवस वापरामुळे त्यांचा घसारा वाढला आहे. वेस्टेज व उत्पादन खर्च वाढला आहे. मुद्रणालयाची स्पर्धा क्षमता व दर्जा कमी झाला आहे.

चलार्थपत्र मुद्रणालयात आठ आणि भारत प्रतिभूती मुद्रणालयात चार नवीन मशिनरी लागल्याने दर्जा वाढणार आहे. त्या आल्यानंतर जुन्या मशिनरी लगेच बाद न करता तीन वर्षे कायम ठेवल्या जातील.

ऑस्ट्रियामधून २०८ कोटींच्या चार सुपर सायामल्टन मशिन येतील. त्यातील तीन चलार्थपत्र मुद्रणालयात, तर भारत प्रतिभूती मुद्रणालयात एकमध्ये लावली जाईल. जपानहून साठ कोटींची एक इंटग्लियो, साठ कोटीच्या दोन कट अॅन्ड पॅक, ९० कोटीच्या तीन नंबरींग मशिन्स नोट प्रेसमध्ये लागतील.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Currency Note Press
Keshubbhai Mahindra : केशूबभाईंनी ‘महिंद्र’ची ठेवली वीट अन् नाशिकच्या अर्थकारणाला मिळाली गती

ई- पासपोर्ट छपाईसाठी भारत प्रतिभूती मुद्रणालयात ५४ कोटींची मशिन येईल. आणखी एक नवीन मशिन लाइनची कार्यवाही सुरू असून, हायर डिनॉमिशनसाठी मायक्रो परफोरेशन वीस कोटीच्या मशिनची ऑर्डर देण्यात आली आहे.

चलार्थपत्र मुद्रणालयात नवीन एक मशिन लाईन जपानच्या तंत्रज्ञांनी नुकतीच लावली आहे. नवीन मशिनरीसाठी मुख्य व्यवस्थापकीय संचालक तृप्तीपात्रा घोष, संचालक एस. के. सिन्हा, अजय अग्रवाल, नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू, आयएसपीचे राजेश बन्सल यांचे सहकार्य लाभले.

त्याबद्दल त्यांचे इंडिया सिक्युरीटी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, अशोक पेखळे, जयराम कोठुळे, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, संतोष कटाळे, अविनाश देवरूखकर, अशोक जाधव, राजू जगताप, इरफान शेख, योगेश कुलवदे, बाळासाहेब ढेरिंगे, बबन सैद, अण्णा सोनवणे, सचिन दिवटे, संतोष कुलथे यांनी आभार मानले आहे.

Currency Note Press
SAKAL Exclusive : तलाठ्यांच्या सहायकांकडून गावठाणच्या सातबारा- सिटीसर्व्हे परस्पर बदल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()