NMC Fraud News : झाडांची कामे मिळविण्यासाठी बनावट दाखले; महापालिकेची फसवणुक

NMC Latest News
NMC Latest Newsesakal
Updated on

नाशिक : शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या तोडणे तसेच झाडांचा घेर कमी करून पालापाचोळा गोळा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत दोन ठेकेदारांनी कामे मिळविण्यासाठी अनुभवाचे बनावट दाखले जोडल्याची बाब समोर आली आहे.

कामे देण्यापूर्वी छाननीत सदरची बाब उघड झाल्याने दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. (Fake certificates to obtain tree works Fraud of NMC nashik crime news)

सातपूर, सिडको, नाशिक पूर्व व पश्चिम तसेच पंचवटी या पाच विभागांसाठी उद्यान विभागाकडून वादळ, वारे, नैसर्गिक कारणांनी उन्मळून पडलेली झाडे उचलून, वाहून नेणे तसेच रस्त्यावरील उभी असलेली वृक्षांच्या धोकादायक फांद्यांचा विस्तार व वाळलेली धोकादायक किडग्रस्त झाडे तोडण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

कामाचा अनुभव असलेल्या एजन्सीला प्राधान्य दिले जाणार होते. त्यानुसार सातपूर विभागासाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत सायली नंदकुमार विसपुते यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बळसाणे ग्रामपंचायत हद्दीत अशाप्रकारचे काम केल्याचा दाखला दिला होता.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

NMC Latest News
Co-operative Societies Elections : मार्चपासून सहकारी संस्थांची रणधुमाळी; निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

परंतु, संबंधित ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता असे कुठलेच काम केले नसल्याचे व कागदोपत्री नोंद नसल्याचे बळसाने ग्रामपंचायतीने कळविल्यानंतर अनुभवाचा दाखला बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

सिडको विभागासाठी विनायक संतोष कोल्हे यांनीदेखील अनुभवाचा बनावट दाखला सादर केल्याची बाब समोर आल्याने दोघांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली. दरम्यान, पूर्व व पंचवटी विभागात शफीयोद्दीन शेख, पश्चिम व सातपूर विभागात विभागात मे. सुजल एन्टरप्रायजेस यांना काम देण्यात आले.

NMC Latest News
Weather Effects : वातावरणामुळे दुभत्या जनावरांच्या क्षमतेवर परिणाम! 10 लिटर मागे सरासरी 2 लिटरची घट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.