ई-पाससाठी बनावट कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र; सायबर पोलिसांची कारवाई

epass
epassesakal
Updated on

नाशिक : जिल्हा व राज्यबंदी (districty lockdown) असल्याने जिल्ह्याबाहेर प्रवेशासाठी ई-पास (e-pass) मिळविण्यासाठी बनावट कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र (corona negative certificate) तयार करून ते पोलिस विभागास (police department) सादर केल्याप्रकरणी सायबर पोलिस (cyber police station) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेमका प्रकार काय?

हायटेक सायबर कॅफेत नागरिकांना ई पास काढून देण्याचे काम

नाशिकच्या ठक्कर बझार येथील हायटेक सायबर कॅफेत नागरिकांना ई पास काढून देण्याचे काम सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास मिळाली. पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांनी बनावट ग्राहकास पाठवले. विवाहानिमित्त धुळे येथे जाण्यासाठी ई पास काढून देण्यास संशयितांना सांगितले. मात्र संशयितांनी वैद्यकीय कारण द्यावे, असे सांगितले. तसेच प्रवास करणाऱ्यांची आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सची फोटोकॉपी घेतली. कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र न मागता पोलिसांच्या संकेतस्थळावर आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी मागितली. याची माहिती निरीक्षक वाघ यांना मिळताच त्यांनी कागदपत्रांची शहानिशा करताना प्रवाशांची आरटीपीसीआर निगेटिव्ह असल्याचा अहवालही जोडल्याचे समोर आले. प्रत्यक्षात प्रवाशांनी कोणत्याही प्रकारची चाचणी केलेली नव्हती.

epass
वैज्ञानिक आधार असल्‍याने भीती नको! कोव्‍हिशील्‍डचा दुसरा डोस ८४ दिवसांनी

चाचणी अहवाल पोलिसांकडे सादर

पोलिसांनी सायबर कॅफेत जाऊन कारवाई करीत तेथील लॅपटॉप व इतर साहित्य जप्त केले. चौकशीत चंद्रकांत छगन मेतकर (वय ५४, श्री सिद्धिविनायक अर्पाटमेंट, आरटीओ कार्यालयाशेजारी, पेठ रोड) यांच्या सांगण्यावरून राहुल रमेश कर्पे (वय ३६, समर्थनगर, मयांक रो हाऊस, जत्रा हॉटेलजवळ) याने कोरोना चाचणी अहवाल एडिट करून त्यावर प्रवाशाचे नाव टाकून बनावट चाचणी अहवाल पोलिसांकडे सादर केल्याचे समोर आले.

epass
Tauktae : नाशिक जिल्हा यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा; आपत्तीकालीन स्थितीत 'हे' करा

गुन्हा दाखल

पोलिस शिपाई राहुल पालखेडे यांच्या तक्रारीवरून दोघा संशयितांनी गणेश बाळासाहेब झिंझुके (महादेवनगर, सातपूर) यांच्यासह इतरांकडून ई पास तयार करण्यासाठी पैसे स्वीकारून त्यांना ई पास मिळविण्यासाठी आवश्यक असलेले कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र तयार करून देत शुक्रवारी (ता. १४) दुपारी अडीचच्या सुमारास ते अपलोड करून फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील तरतुदीच्या कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार संजय मुळक, नाइक विशाल काठे, मनोज डोंगरे, शिपाई विशाल देवरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.