सिडको (जि. नाशिक) : परिसरातील उपेंद्रनगर येथे भाजी बाजारात दोन दिवसापूर्वीच एका भाजी विक्रेत्यास पाचशे रुपयांच्या खोट्या नोटा देत फसवणूक केल्याचा प्रकार समोर ताजा असताना, पुन्हा एकदा असाच प्रकार लेखानगर भाजी बाजारात घडला आहे. (Fake Currency Crime Fraud again by giving fake note of 500 at Cidco Nashik news)
मंगळवारी (ता. ८ ) लेखानगर भाजी बाजार येथे भाजी विक्रेत्या गंगूबाई साळवे या भाजीपाला विकत असताना एका व्यक्तीने चाळीस पन्नास रुपयांचा भाजीपाला घेत पाचशे रुपयाची नोट देऊन उर्वरित पैसे घेऊन निघून गेला. थोड्या वेळात ही नोट नकली असून, दोन कागदांवर कलर प्रिंट करून चिपकवलेल्या असल्याचे त्यांना निदर्शनास आले व आपली फसवणूक झाली असल्याच समजले.
दोन दिवसांपूर्वीच असा प्रकार उपेंद्रनगर भाजी बाजारात घडला असल्यानंतरही या गंभीर बाबीवर पोलिस प्रशासनाने जणू काणाडोळा केला असल्याचा आरोप काही विक्रेत्यांनी केला आहे. ही घटना घडल्यानंतरच त्या इसमाचा शोध लावला असता तर, त्याच्याकडून सर्व नोटा हस्तगत करता आल्या शक्य होते.
सदर संशयित इसमाने अशा एकूण किती नोटा बनवल्या असतील, याचा अंदाज नाही. ही एकच व्यक्ती आहे की मोठी साखळी आहे, याबाबत पोलिस प्रशासनाने गांभीर्याने शोध घ्यायला हवा. गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊन सर्रास पैसे लुटले जात आहेत. जेमतेम हातावर घर असणाऱ्या लोकांची ४०० ते ५०० रुपयांची फसवणूक ही मोठी आहे असेच समजले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.