नाशिक : लष्करात नोकरी देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३२ बेरोजगार तरुणांना गंडा घालणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याने बनावट शिक्के वापरून 39 लाखांचे कर्ज घेत बँकेलाही गंडवले आहे, हे इतक्यावरच थांबलं नाही, तर संशयित गणेश वाळू पवार (वय 26, रा. कोणार्कनगर) याने त्याच्या देखील पुढे जात स्वतःचा जन्मदाता बाप आणि बायकोला देखील फसवल्याचे समोर आले आ्हे.
सैन्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना 32 लाखांचा गंडा घालणारा, बनावट शिक्के वापरून 39 लाखांचे कर्ज घेतलेल्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला नाशिकमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस चौकशीत त्याचे अनेक कारनामे उघड होत असून या भामट्याने काही लष्करी तळाला भेटी देत फोटो काढल्याचे पुढे आल्याने लष्करी यंत्रणा गंभीरपणे हा विषय हाताळत आहे.
बाप आणि बायकोला गंडा
या भामट्याने फसवणुकीची सुरवात स्वतःच्या लष्करातून निवृत्त झालेले वडिल आणि पत्नीपासून केली. पवारचे वडील वाळू पवार हे लष्करातून सेवानिवृत्त झाले त्यांनाही गणेशने २०१७ च्या बॅच मध्ये आपण लष्करात लेफ्टनंट कर्नल झाल्याचे सांगितले. या बातमीने त्यांचा गावात मोठा सत्कार झाला. त्याच्या वडिलांनी २ लाख रुपये खर्चून गावजेवण दिले.
गणेशने स्वतःचे बीए शिक्षण असताना बीएससी शिकलेल्या सटाणा येथील गीतांजली यांच्यासोबत जानेवारीत लष्करात अधिकारी असल्याचे सांगून तिच्याशी लग्न केल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे लग्न केलेल्या पत्नीला आताच त्याचे खरे रूप कळले तेव्हा मोठा धक्का बसला आहे.
देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटल गेटजवळ सुभेदार रामप्पा बनराम यांनी अडवले त्यानंतर त्याच्या पापाचा घडा भरला हरियाणात इस्सार येथील 115 फिल्ड रेजिमेंटमध्ये पोस्टिंग असल्याची त्याने बतावणी केली, पण त्याच्याकडे कुठलेही अधिकृत ओळखपत्र नव्हते. त्याच्याविरोधात सुभेदार रामप्पा बनराम यांच्या तक्रारीवरून गणेश पवारविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.