गुजरातसह नाशिक जिल्ह्यातही वटविल्या त्या नोटा?

fake note
fake noteesakal
Updated on

नाशिक : सुरगाणा तालुक्यात नकली नोटांचे रॅकेट उघड झाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सुरगाण्यात या नोटा छापल्या जात होत्या, त्यानंतर गुजरातमध्ये त्या पोचविल्या जायच्या. गुजरात पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पण त्यानंतर आता आणखी एक माहिती समोर येतेय. सुरगाण्यात छापण्यात येणाऱ्या बनावट नोटा केवळ गुजरातमध्येच नाहीत, तर नाशिक जिल्ह्यातदेखील चलनात आल्या असण्याची शक्यता ग्रामीण पोलिसांनी वर्तविली आहे. (fake-note-racket-Gujarat-including-Nashik-district-marathi-news)

पोलिस अधीक्षकांनी वर्तविली शक्यता

सुरगाण्यातील संशयित आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नाही. संशयितांपैकी एकाचे सेतू केंद्र असून, उधारीचे पैसे परत करण्यासाठी त्याने बनावट नोटांचा उद्योग सुरू केल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिक जिल्ह्यातही संशयितांनी बनावट नोटा वटविल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान सुरगाण्यात छापण्यात येणाऱ्या बनावट नोटा केवळ गुजरातमध्येच नाहीत, तर सुरगाण्यासह नाशिक जिल्ह्यात देखील चलनात आल्या असण्याची शक्यता ग्रामीण पोलिसांनी वर्तविली. सुरगाण्यातून अटक केलेले चारही आरोपी सध्या गुजरातमधील धरमपूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांचा तपास संपल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

सुरगाण्यातील बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

गुजरात पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सुरगाण्या तालुक्यातील गुजरातच्या सीमावर्ती भागातील गुही, मांधा, बोरचोंड या गावातील रहिवासी संशयित संगणकावर नोटांचे स्कॅनिंग करून कलर प्रिंट काढून घेत असत. चारशे रुपयांत पाचशेची नोट, तर चाळीस रुपयांत पन्नासची नोट याप्रमाणे नकली नोटा व्यवहारात खपविण्याकरिता गुजरातमधील पार्थ शाह (रा. भूमी बंगला, धरमपूर जकात नाका), झिपर भोये (रा. मामाभाचे), चिंतू भुजड (रा. गडी), परशुराम पवार (रा. मुरदड) यांना कमिशनवर देत होते. धरमपूरच्या जुन्या फळ बाजारात १२ जूनला झिपर भोये याच्याकडे पाचशेच्या साठ चलनी नोटा आढळल्या. त्याची चौकशी केली असता महाराष्ट्रातील सुरगाणा तालुक्यातून नोटा चलनात आणल्याची कबुली दिली होती. त्यानंतर गुजरात पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना पूर्वसूचना देत संशयितांना अटक केली होती.

fake note
वऱ्हाडी मंडळींना लग्न पडले महागात! 5 हजारांचा बसला फटका
fake note
50 ते 100 रुपयांत देवारपाडेच्या शेतकऱ्याचा यंत्राविष्कार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()