NMC Ghode Patil Farewell : गेल्या चार- साडेचार वर्षात महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने वादग्रस्त ठरलेले व चुकीच्या पद्धतीने दिलेल्या पदोन्नती प्रकरणात चौकशी लागलेले माजी प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांना शुक्रवारी (ता. १६) कर्मचाऱ्यांकडून निरोप देण्यात आला.
या निमित्ताने निरोप समारंभ आयोजित करणारे कर्मचारी वादात सापडले आहेत. (Farewell to NMC controversial manoj Ghode Patil Controversy with staff organizing ceremony nashik news)
मनोज घोडे- पाटील यांची महापालिकेतील कारकीर्द वादग्रस्त ठरली. चुकीच्या पद्धतीने त्यांनी पदोन्नती दिल्याने त्यांच्या कामकाजावर लोकप्रतिनिधी नाराज होते. अभियंत्यांना दिलेल्या पदोन्नतीदेखील मोठा घोळ झाला.
घोडे- पाटील यांच्या बदलीचे आदेश आले. त्यानंतरच्या तीन ते चार दिवसात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून आर्थिक व्यवहार केल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या बांधकाम व नगररचना विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांना पदोन्नतीचे इतिवृत्त मंजूर करण्याच्यादेखील हालचाली झाल्याचे बोलले जात आहे.
घोडे- पाटील यांच्या वादग्रस्त कामकाजावर शिवसेनेच्या म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेना तसेच सफाई कामगार संघटनांनी आक्षेप घेतला. काही कर्मचारी न्यायालयातदेखील गेले आहे. म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन घोडे-पाटील यांच्या कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना दिल्या. चौकशी करण्याचे आदेश देऊन आठ दिवस उलटले तरी अद्यापही चौकशीचा कागद जागचा हलला नाही.
त्यामुळे घोडे-पाटील यांनी येथेही फिल्डिंग लावली का, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान घोडे- पाटील यांची बदली झाल्याने त्यांना प्रशासन विभागाकडून निरोप समारंभ देण्यात आला. वास्तविक पाटील यांची कारकीर्द सर्वाधिक वादग्रस्त ठरली.
असे असतानादेखील प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वाजतगाजत निरोप दिल्याने निरोप समारंभ आयोजित करणारे कर्मचारी यानिमित्ताने चर्चेत आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.