SSC Result : जिद्द, कष्टाच्या जोरावर फरहात शेखचे यश

farhad sheikh
farhad sheikhesakal
Updated on

जुने नाशिक : जिद्द, विशिष्ट लक्ष्य असेल तर सर्व काही शक्य असते. हे दाखवून देण्याचे काम एका स्कूल व्हॅन चालकाची मुलगी फरहात शेख हिने केले आहे. दहावीत परिक्षेत तिने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत ८५ टक्के गुण प्राप्त करत शाळेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. (Farhat Sheikhs success story in ssc result Nashik News)

farhad sheikh
ठेंगोड्यात भंगार दुकानास आग; 5 लाखांचे नुकसान

परिस्थितीची जाणीव असलेल्या फरहात शेख हिने डॉक्टर बनून गोरगरिबांचे मोफत उपचार करण्याचे लक्ष्य केले आहे. ते ध्येय पूर्ण करण्याच्या प्रेरणेतून तिने हलाखीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखवले. फरहातचे वडील खासगी स्कूल व्हॅन चालक आहे. त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. तिच्या यशात वडिलांच्या कष्टासह शिक्षकांनी केलेली मदतीचा मोठा हातभार असल्याचे तिने सांगितले. एकीकडे सर्व सुविधा असताना मुले शिक्षणात अपयशी ठरत असतात, तर दुसरीकडे कुठलीही सुविधा नसताना अशाप्रकारे यश मिळविल्याने शाळेच्या शिक्षकासह परिसरातील नागरिकांनी तिचे कौतुक केले.

farhad sheikh
Crime : देवीचा मळा भागात जमावाने जाळल्या 2 दुचाकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.