मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : सायने बुद्रुक येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, सलग्न दोंडाईचा येथील कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत कुंदन पाटील यांनी ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावात शून्य ऊर्जेवर आधारित शीत कक्षाची उभारणी करून शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवला.
कृषिदूत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. काढणीनंतर फळांमध्ये काही जैविक आणि रासायनिक क्रिया होत असतात. फळे कमी तापमान व योग्य आर्द्रतेमध्ये साठवल्यास या क्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे फळांचा साठवण कालावधी वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे वनस्पतीच्या अभिवृद्धीसाठी लागणारे वनस्पतीचे भाग न सुकता उत्तम राहतात, असे वातावरण तयार करण्यासाठी शीतगृहाची आवश्यकता भासते व त्याची उभारणी ही अत्यंत महागडी असून, ती सर्वसामान्य शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसते. त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीत कक्ष प्रात्यक्षिक पाटील यांनी करून दाखविले.
युवा शेतकरी सागर अहिरे, हृषीकेश सोनेज, किरण सावंत, सागर सावंत, राजू सावंत व आदिवासी शेतकरी उपस्थित होते. हा कृषिज्ञान दौरा पूर्ण करण्यासाठी प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. सूरज चांदूरकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.