मालकाने बांधले चक्क गायीचे मंदिर

गायीचे मंदिर
गायीचे मंदिरesakal
Updated on

सटाणा (जि.नाशिक) : अंतापुर (ता.बागलाण) येथे एका शेतकऱ्याने आपली गाय वृद्धापकाळाने वारल्यानंतर आठवण म्हणून त्या गाईचे चक्क मंदीर बांधून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे . महाराष्ट्रातील ते पहिले गो माता मंदिर ठरले आहे. त्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.

हिंदू धर्मात गाईला धार्मिक दृष्ट्टया महत्व आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीनेही गायीचे दूध, शेण, गोमुत्र याचाही सेंद्रीय शेतीसाठी वापर केला जातो. त्यामुळे देशभरात गोपालनाला प्राधान्य दिले जाते. गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे या श्रद्धेपोटी शेतकरी गोपालन करतो. ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी लक्ष्मी चे पाय असे मानतात.

अंतापूर येथील ह.भ.प.रावण झिंगु अहिरे यांनी विस वर्षांपूर्वी एक वासरू पाळले होते. म्हातारपणामुळे त्यांच्या नळबारी शिवारातील शेतात ती गाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी मरण पावली. गायीची विधिवत श्री अहिरे यांनी घरासमोर विधिवत पूजा अर्चा अंत्यसंस्कार केले. नाथपंथी असलेल्या रावनदादांनी आपले दोन्ही मुले जिभाऊ व भिकाकडे आपल्या गायीच्या आठवणीसाठी मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांच्या इच्छेखातर दोन्ही भावांनी शेतातील रहात्या घरासमोर सहा लाख रुपये खर्चून गोमातेचे भव्य मंदिर बांधले.

मंदिराचा कळस लोकवर्गणीतून उभारला. या गोमातेच्या भव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा गुरुमाऊली कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने व खिरमानी येथील जितेंद्रदास महाराज, खमताने येथील विश्वेश्वर महाराज,रावण दादांचे परमशिष्य ह.भ.प.पोपट मोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.त्यानिमित्ताने ह.भ.प.मुरलीधर महाराज कढरेकर यांचे कीर्तन व हरिनाम सोहळ्यचे आयोजन केले आहे. ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात गोमाता,नंदी व महादेवाची पिंड यांची अंतापुर गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यास विठ्ठल खैरनार, ज्ञानेश्वर खैरनार, दिपक खैरनार, अतुल खैरनार, किशोर खैरनार, शरद खैरनार, अंकुश खैरनार, कारभारी पाटणकर, सोपान खैरनार ,समाधान जगताप, दिलीप निकम, संजय पाटणकर,सर्जेराव सुरसे,अर्जुन सुरसे यांच्यासह सावता भजनी मंडळ, नयन महाराज भजनी मंडळ व अंतापूर परिसरातील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.

गायीचे मंदिर
बोहाडा उत्सवात विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळांनी नाचवले मुखवटे

"गाई मुळे माझी प्रगती झाली, मानसिक स्वास्थ्य लाभले, गाईच्या प्रती असलेली धार्मिक भावना आणि श्रद्धेपोटी गो मातेचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. अंतापुर ग्रामस्थ व भजनी मंडळाने सहकार्य लाभले."

-रावन अहिरे, ह. भ. प.अंतापुर

गायीचे मंदिर
ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात कमालीची वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.