शेतकऱ्याची यशस्वी किमया; पिकवली चक्क 3 रंगांची फुलकोबी

farmer
farmeresakal
Updated on

मेशी (जि. नाशिक) : निसर्गाच्या लहरीपणातून नेहमीच तोट्यात जाणाऱ्या शेती व्यवसायात देखील नफ्याची शेती करता येते. बाजाराची मागणी व शेतीला नावीन्यपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन यांची जोड मिळाल्यास शेती व्यवसायाची नकारात्मक दृष्टी बदलता येते. याचा प्रत्यय वासोळ (ता. देवळा) येथील प्रयोगशील शेतकरी जिभाऊ भगवान देसले यांनी रंगीत फुलकोबी उत्पादनातून दिला आहे. (Farmer successfully ripe 3 color cauliflower in nashik)

रंगीत फुलकोबील फाईव्ह स्टार मागणी

श्री. देसले यांनी तीन रंगांची फुलकोबी पिकवली असून, यात नारंगी, पिवळा आणि हिरव्या रंगाचा समावेश आहे. त्यांनी आपल्या शेतातील २० गुंठे क्षेत्रावर रंगीबेरंगी फुलकोबीचे उत्पादन घेतले आहे. या फुलकोबीला मेट्रो सिटी, फाईव्ह स्टार हॉटेल्स त्याचप्रमाणे इतरही शहरी भागात मागणी चांगली आहे. ग्रामीण भागात या फुलकोबीचे उत्पादन घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांना जणू नवलच वाटत आहे. परिसरात पांढरी फुलकोबी जास्त प्रमाणात पिकवली जाते. परंतु, देसले यांनी रंगीत फुलकोबी पिकवल्याने इतरही शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.

जिभाऊ देसले यांचे चिरंजीव हितेंद्र देसले आणि पुतण्या हेमंत देसले यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रंगीबेरंगी फुलकोबीबद्दल माहिती मिळवली. परंतु, त्यांना रंगीत फुलकोबी बियाणे उपलब्ध होत नव्हते. अखेर देसले यांचा सिजेंटा कंपनीच्या एका प्रतिनिधीशी संपर्क झाला आणि त्यांना २० गुंठे लागवडीसाठी ५ ग्रॅमच्या पुड्यांचे १८ नग प्राप्त झाले. त्यासाठी त्यांना ५६० रुपये प्रतिपुडी इतके पैसे मोजावे लागले.

farmer
वयाची 21 वर्ष पुर्ण झालीत? आज गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा फायदा

या फुलकोबीची साधारणत: ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात लागवड केली जाते. या फुलकोबीला परिपक्व होण्यासाठी ७५ ते ८५ दिवस लागतात. सध्या ही रंगीत फुलकोबी २५ ते ३० रुपये प्रतीकिलो दराने विक्री होत आहे. देसले यांना २० गुंठ्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत २५ ते ३० हजार रुपये इतका खर्च आला आहे. आतापर्यंत चार टन मालाचे उत्पादन घेतले असून, आणखी दोन टन मालाचे उत्पादन मिळू शकते, असा त्यांचा अंदाज आहे.

रंगीबेरंगी फुलकोबी बघण्यासाठी परिसरातून गर्दी होत आहे. अनेक शेतकरी देसले यांच्या शेताला भेट देत आहेत. जाणकारांच्या मते महाराष्ट्रातून पहिल्यांदाच हा प्रयोग नाशिक जिल्ह्यात जिभाऊ देसले यांनी यशस्वी करून दाखविला आहे. या फुलकोबीत विटॅमिन ‘ए’चे प्रमाण असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. त्यात अधिक पोषणतत्वे असल्याने शहरी भागात जास्त मागणी आहे. परंतु, जवळपास असलेल्या परिसरात कांदा, मका आणि बाजरी ही पारंपारिक पिके घेण्यातच शेतकरी गुंतले आहेत.

मुंबईला चांगली मागणी

श्री. देसले नेहमी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करतात. बाजारपेठेत ही फुलकोबी विकली जात नसल्याने देसले यांना सुरवातीला त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना आपला माल विक्रीसाठी मुंबई येथील वाशी आणि गुजरातमधील वापी बाजारपेठेत जावे लागले. ग्रामीण भागातील बाजारपेठेतही व्यापारी वर्ग कोबी खरेदी करू लागल्याने अनेक शेतकरी रंगीत फुलकोबीचे उत्पादन घेण्यास तयार होत आहेत.

असा आहे खर्च

२० गुंठ्यातील लागवडीला बियाण्यासाठी ५६० रुपये प्रती ५ ग्रॅमच्या १८ पुड्या. तीनवेळा औषध फवारणी आणि बाजारपेठेपर्यंत वाहतूक खर्च असा एकूण २५ ते ३० हजार रूपये इतका खर्च आला.

farmer
जेवण व्यवस्थित करत नसल्याचा राग अनावर, मुलाने घेतला वडिलांचा जीव

''रंगीत फुलकोबी घेतल्याने परिसरातून अनेक शेतकरी बघायला येत आहेत. सुरवातीला रोपाची लागवड केली. तेव्हा मनात प्रयोग यशस्वी होतो किंवा नाही अशी भीती होती. परंतु, हेमंत आणि चिरंजीव हितेंद्र यांनी गुगलवर शोधाशोध करून माहिती मिळविली. २० गुंठ्यात आतापर्यंत एकूण चार टन उत्पादन मिळाले आहे.'' - जिभाऊ देसले, प्रयोगशील शेतकरी, वासोळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()