दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा
सांगळे परिवाराने मुलांचा घातपात झाला आहे असे सांगितले आहे. येथील कृष्णा पुंडलिक सांगळे (वय 33) पत्नी विद्या सांगळे यांच्या सह पर्यटन करण्यासाठी केदारनाथ ला गेले. चाटोरी( ता.निफाड )येथील एकनाथ दंडगव्हाळ यांनी पर्यटक खाजगी बस घेऊन गेले.
पर्यटन करत असताना स्वयंपाक सह मदत होईल अन् पर्यटन होईल ह्या हेतूने सांगळे पती पत्नीला सोबत घेतले. परंतू गुजरातच्या निलकंठ धाम यात्रा टूर आली असता पती कृष्णा यांची तब्येत बिघडली. तो मानसिक दृष्ट्या अस्वस्थ झाला होता.
त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्री. दंडगव्हाळ यांनी मित्रांच्या मुलासह सूनबाईला नीलकंठ धाम हुन आयसर ट्रक मध्ये बसून दिले. ह्या ट्रकमध्ये साहित्य भरलेले होते. पती कृष्णा व विद्या सांगळे यांच्यात भांडण झालयाचे संबंधित ट्रक चालकाने पोलीसांना सांगितले.
त्यावेळी रस्ता त उभे राहिलेले वाहने हा प्रकार पाहत होते. आयसर ट्रकमध्ये दोघांनी अकरा तास प्रवास केला आहे. पती कृष्णा सा़गळे विद्याचा मोबाईल सह तीन हजार रूपये घेऊन रस्त्यात एकटा सोडून पळून गेला असे शिंदेखेडा पोलीसांचे म्हणणे आहे. विद्याने पतीचा घटना स्थळी शोध घेतला आहे.
पण तो बेपत्ता झाला होता. कारण मानसिक अस्वस्थता निर्माण झाली होती. तो नशा करत होता असे पोलीस सांगत आहेत. विद्याने धुळेला मुक्काम करून पती सापडत नाही म्हणून नाशिकला माहेरी गेली. त्यानंतर विद्या ने माहेरी व सासरच्या मंडळींना हकीकत सांगितली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सिन्नर एम आय डी सी पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याचे सांगितले. त्यांनतर सांगळे परिवाराने कृष्णा सा़गळे कडील मोबाईल लोकेशन सिन्नर व मिठीगाव ( ता.शिंदखेडा जि.धुळे ) हद्दीतील पोलीसांनी तपासले. त्यानंतर कृष्णा यांचे मुतदेह येथे आढळून आला आहे.
मंगळवारी (ता.16 )रात्री दहाच्या सुमारास घटना घडली आहे. आज घटनेच्या पाचव्या दिवशी कृष्णाचा मुतदेह विहिरीत आढळून आला आहे. त्यांना आत्महत्या केल्याचे व मुतदेहाची दुर्गंधी पसरली होती. तो बुडून वर आल्यावर प्रेत आढळले.
जो मोबाईल फोन व तीन हजार रूपये घेऊन पळायला आहे. ते घटनास्थळी आढळले आहे. यावरून मुलगा कृष्णा यांचा घात पात संशय आहे असे वडील पुंडलिक सांगळे यांनी सांगितले. आज शिंदखेडा रुग्णालयात कृष्णा चा मुतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
शिंदेखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी मयताचा भाऊ यांच्या ताब्यात दिला आहे. सांगळे परिवाराकडे शिंदखेडा पोलीसांनी पाठविले छायाचित्र उपलब्ध आहे. त्यात कृष्णा सा़गळे मुतदेह पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने फुगलेल्या स्थिती आहे.
पाच दिवसांऩतर शिंदेखेडा पोलीसांना आढळून आले आहे. यावरुन घात पात संशय सांगळे परिवाराचा बळवला आहे. पोलीसांनी तपास करावा असे वडील पुंडलिक सांगळे व धनश्याम सांगळे यांनी सांगितले आहे. नायगावला आज रात्री दहाला अ़ंत्यसंस्कार होणार आहे.
शिंदखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक घटनेची नोंद झाली आहे. सांगळे परिवाराने कुष्णा सा़गळे याच्या घटनेबाबत कोणतेही तक्रार दाखल केली नाही.
पोलीसांकडे वैद्यकीय तपासणी पंचनामा अहवाल आल्यानंतर व तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा पुढील तपास करतील असे शिंदखेडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी सकाळ प्रतिनिधी ला मोबाईल वरून बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.