Nashik News : ‘जायकवाडी’साठी पाणी सोडल्यास जलसमाधी; नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणीप्रश्न पेटला

Farmers and BJP activists protesting in the riverbed in front of the dam demanding that water not be released in Jayakwadi Dam.
Farmers and BJP activists protesting in the riverbed in front of the dam demanding that water not be released in Jayakwadi Dam.esakal
Updated on

Nashik News : मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार मराठवाड्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातील उपयुक्त साठा १५ ऑक्टोबरच्या स्थितीनुसार ६५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याच्या हालचाली असल्याने शुक्रवारी (ता. २७) नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणीप्रश्न पेटला.

नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या वक्राकार गेटसमोर भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अमृता पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले.

जायकवाडीसाठी पाणी सोडल्यास त्याच पाण्यात मोठ्या संख्येने जलसमाधी घेण्याचा थेट इशारा पाटबंधारे विभागासह शासनाला शेतकऱ्यांनी दिला. यामुळे नजीकच्या काळात नाशिक विरुद्ध मराठवाडा असा पाणीसंघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. (Farmers and BJP activists protesting in riverbed in front of dam for water not release to jayakwadi dam nashik news)

यंदा अल्प पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, बागलाण तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आता मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून ऑक्टोबरमध्ये देण्यात आले आहेत.

भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा पवार यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यास तीव्र विरोध करीत शुक्रवारी गोदापात्रात ठिय्या देत आंदोलन केले. ‘जायकवाडी’साठी पाणी सोडल्यास आत्मदहन करू, धरणातच जलसमाधी घेऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यामुळे पाणीप्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.

आंदोलनात बाबासाहेब गुजर, गोरख गायकवाड, राजाराम मेमाणे, लहानू मेमाणे, केदारनाथ तासकर, शरद शिंदे, मीलन पाटील, अरुण आव्हाड, अंबादास घोटेकर, भागवत वाघ, रवी आहेर, किशोर बोचरे, विलास नांगरे, श्रीहरी बोचरे, अंकुश तासकर, संदीप लोहटकर, दशरथ सांगळे, संजय पगारे, बापू पगारे, रंगनाथ घोटेकर, किरण कुलकर्णी, गोरख कांदळकर आदींनी नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाच वक्राकार गेटसमोर नदीपात्रात उतरून एक तास ठिय्या आंदोलन केले व जोरदार घोषणाबाजी केली.

Farmers and BJP activists protesting in the riverbed in front of the dam demanding that water not be released in Jayakwadi Dam.
Maratha Reservation : मराठा आरक्षणविरुद्ध वक्तव्याने भुजबळांचा पाय खोलात; संजय पवारांनीही सोडली साथ

आतापर्यंत १७ टीएमसी विसर्ग

यंदा राज्यात अल्प पाऊस झाल्याने राज्यावर दुष्काळाचे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी शुक्रवारी येथील धरणासमोर नदीपात्रात आंदोलन करताना शेतकरी व भाजपचे कार्यकर्ते.सावट असताना नांदूरमध्यमेश्वर धरणातून मॉन्सून माघारी गेल्यावरही पूर पाण्याचा २५० क्यूसेकने दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील ‘जायकवाडी’च्या दिशेने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या पावसाच्या हंगामात शुक्रवारी सकाळपर्यंत १७ टीएमसी विसर्ग ‘जायकवाडी’त झाला.

"पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात अल्प पाऊस झालेला असतानाही नांदूरमध्यमेश्वर धरणातून यंदाच्या हंगामात १७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडलेले आहे. फक्त मद्य बनविणाऱ्या कंपन्यांसाठी पाण्याची मागणी केली जात असल्याचा आरोप करीत एक थेंबही पाणी ‘जायकवाडी’ला सोडू देणार नाही, त्याच पाण्यात सर्वांत अगोदर मी जलसमाधी घेईन." - बाबासाहेब गुजर, आंदोलक शेतकरी

Farmers and BJP activists protesting in the riverbed in front of the dam demanding that water not be released in Jayakwadi Dam.
Nashik News : जिल्ह्यात नवमतदार संख्या 1 टक्क्याहून कमी; नोंदणी वाढण्यासाठी जिल्हाधिकारी पुढाकार घेणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.