Nashik News : साहेब, रस्त्याचा प्रश्‍न सोडवा हो!

Student And Farmer Request to Goverment
Student And Farmer Request to Govermentesakal
Updated on

अंबासन : ‘साहेब... आमच्या शाळेत जाणाऱ्या नाल्यातील रस्त्याचा प्रश्‍न सोडवा हो...’ अशी आर्त हाक येथील शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांकडून प्रशासनाला दिली जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडून पावसाळ्यात लोकसहभागातून नाल्यात भराव टाकून दुरुस्ती केली.

मात्र, पुरपाण्यामुळे रस्त्यावरील भराव तग धरत नसल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती असल्याने अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. शासन, प्रशासनाने याकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याची गरज आहे.

ग्रामीण भागात अनेक गावे, वस्त्या आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. बहुतांश ठिकाणी रस्ते, पूल नसल्याने येण्या- जाण्यासाठी मोठे अडथळे निर्माण होत आहेत. पावसाळ्यात तर अतिशय बिकट परिस्थितीतून शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना जावे लागते. (Farmers And Students request to government for Constructed Road Nashik News)

Student And Farmer Request to Goverment
Nashik News : तालुकानिहाय 100 बड्या थकबाकीदारांची नावे जाहीर

अशीच काहीशी परिस्थिती अंबासन (ता. बागलाण) येथील वाघाड, ढोबले, कुंभाऱ्या व पांझर नाल्याची झाली आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पुरपाणी असते. परिणामी, शेतीशिवारात राहणारे विद्यार्थी शाळेत जाण्यापासून वंचित राहतात.

त्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. या पांदी नाल्याच्या कच्च्या ओबडधोबड रस्त्यावरून दळणवळण करताना शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना चिखल तुटवडत जावे लागते. रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. नाल्यातील रस्त्यांची परिस्थिती बिकट असून, वाहने नेण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही.

एखाद्याची प्रकृती बिघडल्यास रूग्णास रूग्णालयात कसे न्यावे, असा प्रश्‍न निर्माण होतो. यामुळे शेतीशिवारातील शेतकऱ्यांना कठीण प्रसंगांचा सामना करून रूग्णालयात जावे लागते. तसेच, शेतीकरीता लागणारे खते, बियाणे, औषधी साहित्य पावसाळ्यापूर्वीच नेऊन ठेवावे लागते. नाल्यास पावसाळ्यात पूर असल्यास वाहतूक ठप्प होते. प्रशासनाने दखल घेऊन या नाल्याची समस्या सोडवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Student And Farmer Request to Goverment
Nashik News : जिल्ह्यातील आंतरराज्य सीमांवर नाकाबंदी

निधी परत गेल्याची खंत

परिसरात नाल्यातील रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, काही लोकांचा अडथळा निर्माण झाल्याने सदर निधीचा वापर झालाच नसल्याने निधी परत गेल्याची खंत स्थानिक शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून शेतकरी नाल्यातील पक्क्या रस्त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. पावसाळ्यात या नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांकडून शेतीमाल वाहतूक करण्यास तात्पुरता उपाय म्हणून रस्ता काढून देतात.

"पावसाळ्यात नाल्यातून पाणीच पाणी वाहत असल्याने शाळेत जाणे कठीण होते. पुरपाणी थांबेपर्यंत शाळेला दांडी मारावी लागते. आज नाल्यातील वाहते पाणी कमी झाले तरीही पाण्यातून वाट काढत जावे लागते."

- नितीन आहिरे, विद्यार्थी, कुंभारनाला, अंबासन

"आमची शेती ढोबले शिवारात आहे पावसाळ्यात नाल्यातून जाणे मुश्किल होते. आजही या नाल्यातून काही प्रमाणात पाणी वाहत आहे. प्रशासनाने दखल घेऊन दुरुस्ती करावी व शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना आवागमनास रस्ता सुस्थितीत करावा."

- अरूण कोर, तंटामुक्त अध्यक्ष, अंबासन

"शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अनेकवेळा स्वखर्चाने मुरूम टाकून दुरूस्त केला. मात्र, पावसाळ्यात परिस्थिती ‘जैसे थे’ होते. शासनाने याप्रश्‍नी लक्ष घालावे."

- गणपत आहिरे, शेतकरी, अंबासन

Student And Farmer Request to Goverment
Organ Donation : मरावे परी अवयव कीर्तिरूपी उरावे...! अवयवदानाची चळवळ होतेय वृद्धिंगत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.