Nashik Onion Crisis: अवकाळीने झोडपले, अन निर्यातबंदीने रडवले; कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

Onion news
Onion news esakal
Updated on

Nashik Onion Crisis: येथील परिसरात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने आधीच कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता कुठे शेतकऱ्यांच्या कांद्याला थोडा अधिकचा दर मिळण्यास सुरवात झाली असता केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केली.

कांदा निर्यात बंदीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र शासनाच्या या निर्णयाविरोधात रोष उमटत आहे. (farmers angry due to onion export ban and unseasonal rain damage nashik news)

निर्यातबंदीच्या निर्णयामुळे केवळ एकाच दिवसात कांद्याचे बाजारभावात कमीतकमी दोन हजार रुपये प्रति क्विंटलने घसरले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले.

आधीच ऑगस्ट महिन्यात चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्क व त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य लागू करून गेल्या चार, महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्याचे काम केंद्र सरकारकडून केले गेले. तेव्हाही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. चाळींमध्ये साठवलेल्या कांद्याला दर मिळण्यास सुरवात झाली.

Onion news
Sharad Pawar: शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कांदाप्रश्नी चांदवडला आंदोलन

केंद्रसरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेऊन तेव्हाही भाव पाडले. त्यामुळे आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करण्याची क्षमता आता शेतकऱ्यांमध्ये राहिली नाही.

कांदा निर्यातबंदी केल्याने पुढील हंगामाचे आर्थिक बजेट विस्कळित झाले असून, दुकानदारांची देणी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. घसरत्या भावामुळे उत्पादन खर्चही सुटत नाही.राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची चर्चा असून, निर्यातबंदीचा निषेध करीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी तत्काळ निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली.

Onion news
Nashik Grapes Crisis: 20 लाखांचे कर्ज फेडायचे कसे? नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.