बळीराजाची खरीप हंगामाची लगबग सुरू; भात पेरणीच्या कामांना वेग

farming
farmingesakal
Updated on
Summary

इगतपुरी तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध तालुका म्हणून ओळखला जातो. पोषक असे वातावरण असलेल्या व पाऊसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात हंगामातील पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाचे योग्य वेळेवर आगमन झाल्यामुळे भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. भात लागवडीत अग्रेसर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदा ३२ हजार २३७ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवले असून, चालू हंगामात तालुक्यात २७ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे. (Farmers are sowing in Igatpuri taluka)

इगतपुरी तालुका भात पिकासाठी प्रसिद्ध

तालुक्यात १२६ महसूली गावे व वाड्यांमधील शेतकरी भात, वरई, नागली, सोयाबीन, खुरसणी, मका, उडीद व इतर पिके घेतात. खरीप हंगामात इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ, सोनम, गरी, हाळी, कोळपी, पूनम, आठ चोवीस या जातीचे भात पिके घेण्यास प्राधान्य देतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ३३२ हेक्टर असून, यंदाच्या खरीप पेरणीचे उद्दिष्ट ३२ हजार ८३० हेक्टर असल्याची माहीती कृषी विभागाने दिली. गेल्या हंगामात एकत्रित २७३० मि. मी पावसाची नोंद घेण्यात आली होती.


इगतपुरी तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध तालुका म्हणून ओळखला जातो. पोषक असे वातावरण असलेल्या व पाऊसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात भात शेतीला मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. खतांच्या वाढणाऱ्या किमती, बी- बियाणे, औषधे वापरून शेतकरी मेटाकुटीस आला असून खतांच्या किंमतीत दरवर्षी दहा टक्यानी वाढ होत आहे. भाताला दरवर्षी भाव आहे तोच राहतो. दरम्यान, गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पावसान झाल्याने भात पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते.

farming
नाशिकमध्ये व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते हॅकर्सच्या टार्गेट लिस्टवर!

असे आहे खरिपाचे नियोजन :

पीक कंसात लागवडीचे उद्दिष्ट्य क्षेत्र हेक्टरमध्ये :
भात -२८ हजार २००, नागली- ९१७, मका १२२, कडधान्ये - १९०, भईमुग ३६८, सोयाबीन ९११, खुरासनी - ६००

''जूनच्या सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने यावर्षी खरीप हंगामाला योग्य वेळी सुरवात झाली आहे. तालुक्यातील समाधानकारक शेतीपूरक पाऊस झाल्याने व दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे."
- पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, पंचायत समिती.

(Farmers are sowing in Igatpuri taluka)

farming
केळी निर्यातीसाठी अपेडातर्फे ‘बनाना नेट’ होणार कार्यान्वित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()