Surat Chennai Highway : सुरत-चेन्नई महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनींचे जाहीर केलेले अवॉर्ड चुकीचे असून ते तत्काळ मागे घ्यावे, यासाठी आग्रही शेतकऱ्यांच्या मागणीनंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करीत फेरआढावा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष सुधारित आदेशाकडे लागले आहे.
जमीन मोजणी करताना बागायती जमिनी या हंगामी बागायती दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली असून अवॉर्ड जाहीर करताना बाधित शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता कार्यालयात बसून यंत्रणेकडून जमिनीचे दर ठरविले आहेत असा बाधित शेतकऱ्यांचा आरोप आहे. (Farmers attention to revised order of Surat Chennai highway nashik news)
त्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत श्री. गडकरी यांना भेटून लक्ष घालण्याची मागणी केली. समृद्धी महामार्ग आणि नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग या दोन रस्त्याच्या भूसंपादनाचे दर शेतकरी केंद्रबिंदू मानतात, यासाठी पाच पट दर देण्यात आला, त्याच दराने जमिनी घेतल्या जाव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
प्रश्न ९९८ हेक्टरचा
नाशिक जिल्ह्यात पेठ, दिंडोरी, नाशिक,निफाड व सिन्नर तालुक्यात प्रकल्पासाठी ९९८ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. बहुतांश गावात खरेदीखते दीड ते तीन कोटी रुपये दराची असताना अधिकाऱ्यांनी भूसंपादनाचे निवाडे जाहीर करताना खरेदीखत, रेडीरेकनर मूलभूत विषयही दुर्लक्षित करीत जमिनीचे मूल्यांकन कमी दाखविले. सुरगाणा वगळता अन्य पाचही तालुक्यात औद्योगीकरण झालेले असल्याने जमिनींना ‘डी’ झोनमधील जास्त मूल्याची खरेदीखत गृहीत धरावेत असा शेतकऱ्यांचा आग्रह आहे.
आंदोलकांचे आक्षेप....
भूसंपादन मूल्यांकनापूर्वी बागायती क्षेत्र हंगामी बागायती दाखवणे, द्राक्षबागांचे अतिशय कमी मूल्यांकन, अनेक मुद्यांवर कृषीसह संबंधित यंत्रणेचे मार्गदर्शन न घेता परस्पर दरनिश्चिती यावर प्रशासनाने कुठलाही विचार न करता दर जाहीर करण्याची घाई केली गेली. गावनिहाय बैठका घेतल्या नाहीत. द्राक्षबागांचा दर ठरवताना कृषी विभागाने बाजार समितीत विकल्या जाणाऱ्या द्राक्षाच्या बाजारभावाप्रमाणे दर ठरवले.
कृषी विभागाने असे काढले दर
द्राक्षाचे १ झाड साधारण १२ वर्ष फळ देते तसेच एका झाडाला १८ किलो द्राक्ष येतात असे गृहीत धरून त्यातून ३० टक्के खर्च वजा जाता झाडाची किंमत १२९१ रुपये लावली आहे. प्रत्यक्षात एका वर्षात एका झाडाला २० ते २५ किलो द्राक्ष येतात. दरवर्षी किलो असा १२ वर्षाचा विचार केला तर २४० किलो माल निघतो. २८ रुपये प्रति किलो असा दर शासनाने धरला तर बारा वर्षांची मूल्य ६७२० होतात. यात ३० टक्के उत्पादन खर्च जरी वजा केला तरी ४ हजार ७०४ रुपये कमीत कमी दर मिळतो असे असताना कृषी विभागाने अवघा १२९१ रुपये दर देऊन दिशाभूल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.