नाशिक : सय्यद पिंपरी येथे शेतकऱ्यांनी महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन सुरू केले आहे. येथील शेतकऱ्यांना दिलेली वाढीव बिले दुरुस्त करून मिळावीत तसेच विज पुरवठा सुरळीत व्हावा या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगून देखील कुठलाही फरक नाही उलट गेल्या दोन दिवसापासून गावातील डीपी बंद केल्याने शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी देखील उपलब्ध होणे जिकरीचे झाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. शेतकरी वीज वितरण कंपनीचे हाय व्होल्टेज पोलवर चढून बसले असून जोपर्यंत डीपी चालू होत नाही, तोपर्यंत उतरणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गेले दोन तासांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू आहे, येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी अधिकारी पोलीस प्रशासन जमले आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.