Success Story : शेतकरी कन्येची 19 व्या वर्षी पेलिस दलात निवड! सर्वच स्थरातून कौतुकाचा वर्षाव

Vaibhav Pawar, Shravan Borse felicitating Ankita Shewale on behalf of the Gram Panchayat for her selection in the police force.
Vaibhav Pawar, Shravan Borse felicitating Ankita Shewale on behalf of the Gram Panchayat for her selection in the police force.esakal
Updated on

Success Story : खामखेडा (ता. देवळा) येथील शेतकरी रवींद्र गंगाधर शेवाळे यांची कन्या अंकिता हिने पोलिस भरतीचे सर्व निकष पूर्ण करत विविध अडथळ्यांच्या शर्यतीनंतर तिची अवघ्या १९ व्या वर्षी रेल्वे पोलिस दलात निवड झाली आहे. या निवडीने ग्रामस्थांसह तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Farmers daughter ankita shevale selected in Pelis force at age of 19 Success Story nashik news)

गेल्यावर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या अंकिताने प्रथम वर्ष कला शाखेसाठी बहिस्त प्रवेश घेत नाशिक येथील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला अन सात महिन्यातच वयाच्या एकोणवीस वर्ष पूर्ण करण्याच्या आतच यशाला गवसणी घातली. अंकिताने याआधी शालेय स्तरावर जलतरण स्पर्धेत घवघवीत यश मिळविले होते.

जानेवारी महिन्यात तिने रेल्वे पोलीस भरतीसाठी मैदानी स्पर्धेत चांगले गुण मिळवत लेखी परीक्षेसाठी पात्र झाली होती. लेखी परीक्षा दिल्यानंतर नुकताच तिचा निकाल जाहीर झाला. त्यात अंकिताने यश मिळवत रेल्वे पोलीसासाठी ती पात्र ठरली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Vaibhav Pawar, Shravan Borse felicitating Ankita Shewale on behalf of the Gram Panchayat for her selection in the police force.
Saptashrungi Devi : आदिमायेचे ऐच्छिक सशुल्क व्हीआयपी दर्शन सुविधा पूर्ववत

अंकिता ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. तिचे आई रेखा व वडील रविंद्र शेतकरी आहेत.वडील अल्पशिक्षित असतांना देखील आजोबा गंगाधर शेवाळे व आजी सुनंदा यांनी खेड्यात शिक्षणाची गैरसोय होईल म्हणून लोणी (प्रवरानगर) येथे तिला पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

जिद्द व चिकाटी यांचा अंकिताला फायदा झाल्याचे सूर्या ॲकॅडमीचे संचालक समीर काकड व तुषार कैचे यांनी सांगितले. खामखेडयातील या शेतकरी कन्येने मिळवलेल्या यशाबद्दल खामखेडा कौतुकाचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल अंकिता हिचा ग्रामपंचायततर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच वैभव पवार, उपसरपंच श्रावण बोरसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

"आजी आजोबा,आई यांच्या प्रोत्साहनाने माझी पोलिस होण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. भविष्यात मी नक्कीच इतर मुलींना पोलिस दलात येण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन करेल."

- अंकिता शेवाळे, खामखेडा.

Vaibhav Pawar, Shravan Borse felicitating Ankita Shewale on behalf of the Gram Panchayat for her selection in the police force.
SAKAL Exclusive : शेळी हेच आमचे पीक, तेच आमचे एटीएम! एकनाथ हगवणे यांनी शेळीपालनातून गाठला नवा पल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.