Nashik District Bank : दगडपिंप्रीच्या कर्जदार शेतकऱ्याचा मृत्यू; जिल्हा बॅंकेतर्फे बुधवारी होता शेतीचा लिलाव

Death News
Death Newsesakal
Updated on

Nashik District Bank : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने जप्त केलेल्या शेतजमिनीचा ६ सप्टेंबरला होणाऱ्या जाहीर लिलावाचा धसका घेतल्याने दगडपिंप्री (ता. दिंडोरी) येथील दिलीप अमृता चौधरी (वय ४९) या शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी केला.

बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष वधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी समजूत काढल्यावर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. (farmers death due to district bank auction of agriculture land nashik news)

दिलीप चौधरी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी (ता. ३) सकाळी आठला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी दगडपिंप्री आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून ९१ हजारांचे कर्ज २००८ मध्ये घेतलेले होते.

त्यावर व्याजासह ३१ मे २०२३ अखेर सुमारे २३ लाख ४३ हजार ४२४ रुपयांची थकबाकी अधिक व्याज व अनुषंगिक खर्च अशा रकमेच्या वसुलीसाठी दगडपिंप्री शिवारातील गट क्रमांक ३८/४ मधील शेतजमिनीच्या लिलावाची नोटीस काढण्यात आली होती. बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावून थकबाकी वसुलीसाठी तगादा सुरू होता.

जप्त केलेल्या जमिनीचा ६ सप्टेंबरला लिलाव होणार असल्याने श्री. चौधरी यांनी धसका घेतल्याने ते ताणतणावात असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. त्यातून त्यांना रविवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने वणी येथे खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरला विनादुधाच्या पेढ्यासह खाद्यपदार्थ जप्त; अन्न प्रशासनाची कारवाई

नातेवाइकांनी वणी ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आलेला मृतदेह बँक प्रशासनावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वणी ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण होऊन गर्दी झाली होती.

दरम्यान, बँकेचे विभागीय अधिकारी गांगुर्डे हे चार तासांनंतर वणी पोलिस ठाण्यात आल्यावर त्यांच्यावर संतप्त शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार करून वसुलीसाठी ५०-६० जणांचे पथक शेतकऱ्यांच्या घरी पाठवून धाक दाखवत असल्याचा आरोप केला. ही लिलावाची प्रक्रिया स्थगित करण्याचे प्रशासनास कळविले जाईल, एवढेच आश्वासन विभागीय अधिकारी गांगुर्डे यांनी दिले.

शेतकरी संघटनांकडून निषेध

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती कैलास मवाळ, गंगाधर निखाडे, पंचायत समितीचे माजी सभापती चिंधू पाटील, माजी उपसभापती उत्तम जाधव, अॅड. विलास निरघुडे, आनंदराव चौधरी, नामदेव घडवजे, बाळासाहेब घडवजे, राजेंद्र महाले आदींसह पोलिस ठाण्याच्या आवारात जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीस विरोध करीत घटनेचा निषेध केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांनी नातेवाइकांची समजूत काढल्यावर सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर रात्री दगडपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Death News
PM Vishwakarma Yojana : 12 बलुतेदारांना कमी दराने व्यावसायिक कर्ज; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.