Nashik News : कसमादेसह उत्तर महाराष्ट्रावर या वर्षी पाऊस रुसला आहे. पावसाळा सुरु होऊन अडीच महिने झाले तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. पेरण्या खोळंबल्या आहेत.
केलेल्या पेरण्या वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट बळीराजापुढे उभे आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐन पावसाळ्यात ऐरणीवर येत आहे. अशा परिस्थितीत अनेक जण पशुधन विकण्याच्या मन:स्थितीत आहेत.
शेतकरी, पशुधन सांभाळणाऱ्यांना येथील गोरक्षकांनी ‘पशुधन विकू नका, आम्ही विनामूल्य सांभाळतो’ अशी आर्त हाक दिली आहे. (Farmers Dont Sell Livestock We Take Care Appeal of cow vigilantes social activists to farmers Nashik News)
या वर्षी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यातच पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ पाणी, चारा टंचाईमुळे काही शेतकऱ्यांनी पोटाच्या मुलासारखे जपलेले जनावरे, शेळ्या, मेंढ्या विकायला काढल्या आहेत. परंतु बाजारातही पशुधनाला फारशी किंमत नाही.
पशुधन कत्तलीसाठी कसायाच्या ताब्यात जाण्याच्या शक्यतेमुळे येथील विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे, पंकज कोठारी, समीर जोशी, जितेंद्र लाड यांनी पुढाकार घेऊन मालेगाव येथील गोवंश रक्षा समिती, गोशाळा मालेगाव यांच्याशी संपर्क साधून पशुधन वाचविण्याची विनंती केली.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन गो शाळेचे सुभाष मालू, ॲड. हिरे व काकाणी विद्यालयाच्या १९८६ मधील तत्कालीन दहावीच्या सवंगड्यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दुष्काळाचे सावट दूर होईपर्यंत निळगव्हाण येथील गो शाळेत सर्व जनावरे विनामूल्य सांभाळले जाणार आहे.
शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत पशुधन विक्री करू नये. पशुधन सांभाळण्या संदर्भात निळगव्हाण येथील गो शाळेशी संपर्क साधावा असे आवाहन ॲड. हिरे, पंकज कोठारी, प्रमोद शुक्ला, समीर जोशी, जितेंद्र लाड, पदमेश मेहता, अभय शिंणकार, रवींद्र शर्मा आदींनी केले आहे.
"निळगव्हाण येथील गो शाळेत पशुधन सांभाळण्याची व्यवस्था आहे. जनावरांना रोज चारा पाणी वेळेवर दिला जातो. पशुधन सेवेसाठी २६ कर्मचारी कार्यान्वित आहेत. सध्या गो शाळेत आठशे पेक्षा अधिक जनावरे आहेत. पशुधन वाढल्यास ही संख्या वाढविण्यात येईल. शेतकरी व पशुधन सांभाळणाऱ्यांनी गोशाळा निळगव्हाण येथे सकाळी आठ ते सायंकाळी सात यावेळेत संपर्क साधावा. दुष्काळी परिस्थिती निवळल्यानंतर शेतकऱ्यांचे पशुधन परत केले जाईल."
- सुभाष मालू, अध्यक्ष, गोवंश रक्षा समिती, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.