प्रतिकूलतेत पिकवलेल्या द्राक्षांची युरोपातही गोडी

yeola grapes
yeola grapesesakal
Updated on

येवला (जि.नाशिक) : कोरोनाचा (coronavirus) घाला, गारपीट, सततचा पाऊस, द्राक्षबागांमध्ये गुडगाभर साचलेले पाणी, रोगाचा प्रादुर्भाव आणि फवारणीवर फवारण्याची वेळ, अशा प्रतिकूल वातावरणात दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हिंमत न हरता निर्यातक्षम द्राक्षाचे पीक घेतले आहे. कृषी विभागाच्या सल्ल्याने यंदा पिकवलेली द्राक्षे थेट नेदरलँड, जर्मनी, यूके, डेन्मार्क, रशिया आदी देशांमध्ये पोचली असून, तेथे भाव खात आहे. (farmers-grown-grapes-export-in-Europe-nashik-marathi-news)

दुष्काळी येवल्यातून निर्यात वाढली

यंदा फ्लॉवर स्टेजवेळी आणि मणीमध्ये पाणी उतरतेवेळी दोन स्टेजला पिकाला मार बसला होता. तरीही जिद्दीने शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष पिकवलीच. यंदा तीन हजार ८०० टन द्राक्षाची निर्यात झाली, पण भावाने मार खाल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. राज्यात ९४ तालुके कायमची टंचाईग्रस्त असून, ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवल्याचे नाव टॉपला आहे. मात्र ठिबक, शेततळ्यासह अनेक पर्याय शोधून येथील शेतकऱ्यांनी प्रयोगशीलतेतून जगाला गवसणी घातली आहे. कांदा आणि मक्याचे आगर असलेल्या येथील शेतीत अनेक नवनवीन प्रयोग झाले. कापूस, बांबू, बोनेट अन् शिमला मिरची, केसर, आंबा, हळद यापासून शेवग्यापर्यंत पिकाचे प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी केले आहेत. यंदा कोरोनाची लाट, बिगरमोसमी पाऊस अन् लहरी हवामानामुळे द्राक्षबागा निघणार की नाही, याची शाश्वती नव्हती. पण या संकटावर मात करून द्राक्ष निर्यात करून येथील शेतकऱ्यांनी आपली जिद्द सोडली नाही हे विशेष!

भाव घटल्याने कोट्यवधींचे नुकसान

या वर्षी येवल्यात द्राक्ष निर्यातीसाठी नवीन ४७२ व जुने २९७, अशा ७६९ नोंद केली होती. त्यापैकी ३६५ शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट प्रमाणपत्र घेतले होते. त्यांनी पिकवलेल्या १९२ हेक्टर क्षेत्रावरील तपासणी करून द्राक्ष निर्यात झाली आहे. तालुक्यात झालेली अतिवृष्टी, अवेळी झालेला पाऊस, वातावरणातील बदल यामुळे घडामध्ये डाग पडले. जास्त पावसामुळे मण्यांची संख्या कमी झाली, घड भरले नाहीत. परिणामी घडांचे वजन कमी झाले. पावसामुळे फवारणीचा खर्च वाढला, त्या प्रमाणात उत्पादनात वाढ न होता त्यात घट झाली आहे.

हिंमत न हरता शेतकऱ्यांनी केली निर्यात

त्याप्रमाणे मागणी कमी असल्याने आहे, त्या मालाला योग्य ती किंमत न मिळाल्याने एक्सपोर्टचा माल स्थानिक भावाने द्यावा लागला. या वर्षी घडावर लाल कोळी व मिलिबगमुळे घडावर चिकटा पडून माल एक्सपोर्टला अडथळे आहे. या वर्षी फ्लावर इन स्टेज वेळी पाऊस झाल्याने फुलगळ झाली. परिणामी झाडावर मण्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे वजनात घट झाली. दर वर्षी एकरी विक्री १७ टन सरासरी क्षेत्रात येत असताना या वर्षी मात्र दहा टन एकरी समाधान मानावे लागले. या वर्षी थॉमसनला ६५ ते ११८ (सरासरी ९१), क्रिमसनला सरासरी ९३, तर सोनाकाला ३५ ते ७१ (सरासरी ५३) असे दर मिळाले. म्हणजे या वर्षी निर्यातीच्या द्राक्षाची स्थानिक भावाने विक्री झाल्याने या वर्षी जास्तीचे पैसे न मिळता तोटाच झाला, असेच म्हणावे लागेल. तरीही हिंमत न हरता शेतकऱ्यांनी निर्यात केली आहे.

yeola grapes
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ऑटोमोबाईल कंपन्यांना फटका

पावसाने नुकसान करूनही शेतकऱ्यांनी गुणवत्ता जपली. म्हणूनच द्राक्ष निर्यातीला वाव मिळाला. दहा वर्षांत निर्यातीचा आलेख उंचावत राहिला असून, यंदा आकडे टिकून आहेत. यंदा वातावरणामुळे मण्यांची संख्या कमी झाली, घड भरले नाहीत. या वर्षी दोन वेळा पंचनामा करावे लागले, तरीही निर्यातीचे आकडे समाधानकारक आहेत. - प्रकाश जवणे, साईनाथ कालेकर, फायटो सॅनेटरी इन्स्पेक्टर, कृषी विभाग, येवला

निर्यातीचे आकडे

२०१५ - ४०० टन

२०१६ - सुमारे १८०० टन

२०१७ - सुमारे २८७३ टन

२०१८ - २८०० टन

२०१९ - ३७८६ टन

२०२०- २७७१ टन

yeola grapes
नाशिकमधील सुंदरनारायण मंदिर जीर्णोद्धाराचे काम रखडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.