विकास गिते
Nashik Monsoon Rain : बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने सिन्नर तालुका ओलाचिंब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मृग नक्षत्रात पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली होती.
त्यामुळे शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत होते. आद्रा नक्षत्राला सुरुवात होताच वरुणराजाने सिन्नर तालुक्यातील परिसरात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. (farmers happy with arrival of Monsoon Rain Planting started in Sinnar area nashik news)
बिपरजॉय वादळामुळे यंदा पावसाला दाखल होण्यास विलंब झाला आहे. पाऊस नसल्याने . त्यामुळे पावसाअभावी दुबार बियाने खरेदीचे संकट शेतकऱ्यावर आले होते. त्यामुळे मृग नक्षत्रात पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
मात्र, मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या धूळपेरणीसाठी पावसाचे आगमन गरजेचे झाले होते. परिणामी, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. अशातच मंगळवारी (ता. २७) परिसरातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
त्यामुळे अपक्षेप्रमाणे जरी पावसाचे आगमन झाले नसले, तरी दरवर्षी पेक्षा यंदा पाऊस खूप उशिरा हजर झाला आहे. पण पावसाचे दणक्यात आगमन झाले आहे. पावसाच्या या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.
उशिरा का होईना, पाऊस सुरू झाल्याने बरेच दिवस आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या जीवाला दिलासा मिळाला आहे. असे असतानाच शेतकऱ्यांची पेरण्यापूर्वी मशागतीसाठी आणि पेरणीसाठी लागणारी बियाणे, खते, औषधांच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी कंबर कसली आहे. साधारपणे १५ जूनपर्यंत मोसमी पाऊस राज्यात दाखल होतो आणि पुढे वाटचाल करतो, पण यंदा २५ जूनची वाट पाहायला लागली.
त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्व आणि पेरणीची सर्व काम खोळंबली होती. पण आता पावसाचे आगमन झाले असून राज्यात सर्वदूर पाऊस पडत आला आहे.
शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतीशिवारात वर्दळ वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या उन्हाळी मशागती झाल्या आहेत. त्यांची पावले बियाणे, खते,औषधांच्या खरेदीसाठी कृषीसेवा केंद्राकडे वळत आहेत.
पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास शेतकरी घाई करून पुढील १५ दिवसातच पेरण्या उरकून घेतील अशी स्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.