Soya Bean Rates Hike : सोयाबीनच्या दरवाढीने उत्पादकांमध्ये आनंद

Traders' ongoing scramble to buy soybeans as imports fall short of demand.
Traders' ongoing scramble to buy soybeans as imports fall short of demand.esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : केंद्र सरकारने सोयाबीनच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबरोबर आणि आयात होणाऱ्या खाद्यतेलावर अकुंश लावण्यासाठी पामतेल, सोयातेलवर अंकुश लावण्यासाठी इतर खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सोयाबीनला सध्या साडेपाच हजार रूपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Farmers happy with increase in soybean prices Nashik news)

कमी कालावधीत हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीनचे पीक करतात. बाजारपेठेत आवक वाढली, की दर गडगडतात हे सूत्र आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून असलेला हा ट्रेंड सोयाबीनच्या बाबतीत बदलला आहे. दोन वर्षापासून सोयाबीनला १० हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे. त्यामुळे निफाड तालुक्यात यंदा १७ हजार हेक्टर एवढी विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरणी झाली आहे. लांबलेल्या पावसाने सोयाबीन पिकाची मोठी नासाडी झाली. हातातोंडाशी आलेला खास हिरविला जातो की काय अशी स्थिती होती. पण तरीही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील हुकमी एक्का असलेल्या सोयाबीनचे चांगले उत्पन्न घेतले आहे.

दिवाळीच्या दरम्यान पैशांची निकड असल्याने शेतकऱ्यांनी भिजलेली सोयाबीन काढणी करून बाजारात विक्रीला नेले. भिजल्याने ते सोयाबीन काळसर पडले. त्यामुळे दिवाळीपुर्वी सोयाबीनचे भाव गडगडले होते. सोयाबीनचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.

सोयाबीनच्या बाबतीत उत्पादक शेतकरी यांना दिलासा देण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या खाद्यतेलावर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने सोयातेलासह खाद्यतेलांवरील आयात शुल्कात गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक वाढ केली.यासह सोयाबीनच्या साठ्यावरील मर्यादा हटविल्याने व्यापारी खरेदीसाठी उतरले आहेत.त्यातच तेल उत्पादक मिल कंपन्यांकडून सोयाबीनची मागणी वाढली आहे. त्यामुळे दरात उसळी घेतली आहे

पालखेड उप बाजारात सोयाबीनची आवक वाढलीही तीन हजार ७१० रुपये क्विंटल हमीभाव असलेल्या सोयाबीनला साडेपाच हजार रुपये भाव मिळू लागला आहे. दर वाढल्याने बाजारात दररोज होणारी चार हजार क्विंटलची आवक दोन ते अडीच हजार क्विंटलवर आली आहे. आवक कमी व मागणी अधिक असल्याने दराचा आलेख अधिक उंचावण्याची शक्यता आहे.

Traders' ongoing scramble to buy soybeans as imports fall short of demand.
Nashik : जुन्या बसस्थानकाचे सीसीटीव्ही 4 वर्षांपासून बंद; प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

आठ दिवसांत एक हजार रूपयाची दरवाढ

दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली होती.शिवाय दिवसाकाठी दर घटतच होते.त्यामुळे दिवाळीनिमित्त बाजारपेठा बंद होण्यापूर्वी सोयाबीन चार हजार रुपयांपर्यंत खाली आले.मात्र,दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कायम सुधारणा झाली आहे.चार हजार ८०० रुपयांवर असलेले सोयाबीन आज पाच हजार ८०० रुपये झाले आहे.आठ दिवसांत तब्बल हजार रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीन वधारले आहे. परराज्यातून झालेली मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून सोयाबीन खरेदीत चढाओढ सुरू आहे.

"पालखेड उपबाजारात सोयाबीनच्या लिलावासाठी आवश्‍यक वजनकाटा व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रोख पेमेंटची शिस्त व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे कधीकाळी मिरचीची राजधानी असलेले पालखेड आता सोयाबीनची बाजारपेठ झाली आहे."

-आमदार दिलीप बनकर (सभापती, बाजार समिती,पिंपळगाव बसवंत)

"केंद्र शासनाने तेल आयातीचे धोरण बदलताना सोयाबीनच्या साठ्यावरील निर्बंध उठविले. त्यातच तेल उत्पादक मिल कंपन्यांकडून सोयाबीनची मागणी वाढली आहे. त्यांचा सकारात्मक परिणाम झाला असून सोयाबीनचे दर लवकरच ६ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत जातील."

-मंगेश छाजेड (व्यापारी, पालखेड)

"पावसाने कहर केल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यातच दर पडल्याने दुष्काळात तेरावा महिना झाला. आता दरवाढ होत असून तेजीचा फायदा घेण्यासाठी शेतकरी ही सोयाबीनचा साठा करत टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणत आहे." - रणजीत वाघ (शेतकरी, रानवड)

Traders' ongoing scramble to buy soybeans as imports fall short of demand.
SAKAL Exclusive : गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी महसूल यंत्रणेची दमछाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()