बागलाणच्या मातीत काश्मीरची सफरचंद; शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Apple
AppleSakal
Updated on

नामपूर/अंबासन (जि. नाशिक) : फळशेतीची प्रयोगशाळा म्हणून बागलाणची जगभरात ओळख आहे. बागलाणमधील अर्ली द्राक्षे, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, केळी, सीताफळ, टोमॅटो, रंगीत ढोबळी मिरची, कांदा आदी फळे व भाजीपाल्याने जागतिक बाजारपेठेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. येथील प्रयोगशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या शेतीत निरनिराळे प्रयोग करून विविध प्रकारचे फळे, भाज्या पिकविण्यासाठी प्रयत्नशील असतात. आखतवाडे (ता. बागलाण) येथील युवा शेतकरी चंद्रकांत ह्याळीज यांनी आपल्या शेतात सफरचंदाची यशस्वी लागवड करून कृषी क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. (Farmers in Baglan have started producing apples nashik news)


सफरचंद म्हटले, की आपल्याला पहिल्यांदा आठवते काश्मीर. काश्मीर व्यतिरिक्त सफरचंद पिकूच शकत नाही, अशी दृढ भावना सर्व नागरिकांमध्ये आहे. आखतवाडे येथील सव्वीसवर्षीय युवा शेतकरी चंद्रकांत पंढरीनाथ ह्याळीज यांना गुगलच्या माध्यमातून सफरचंद शेतीविषयी आवड निर्माण झाली. आपल्या शेतात प्रयोग करून बघण्यास हरकत नाही, असे म्हणत चंद्रकांत याने हिमाचल प्रदेश येथील रजित बायोटेक नर्सरीमधून ५० रोपांची मागणी नोंदविली. त्यानुसार नर्सरीच्या संचालकांकडून सफरचंद लागवडीविषयी मार्गदर्शनही मिळाले. लागवड कधी करायची, पाण्याचे प्रमाण, तापमान, औषधे देण्याची पद्धत आदींबाबत योग्य सल्ला मिळाल्यानंतर चंद्रकांतने रजित बायोटेक नर्सरीच्या मार्गदर्शनातून सफरचंदाची लागवड केली व त्याची योग्य ती निगा घेतली. त्यात यश मिळत असल्याने चंद्रकांत व त्यांच्या कुटुंबीयांचा उत्साह द्विगुणित झाला. योग्य नियोजनातून आज सफरचंद आल्याने ह्याळीज कुटुंबीय व गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर सफरचंद शेतीची पोस्ट आल्यानंतर तालुक्यात अनेक अभ्यासू शेतकऱ्यांचे पाय ह्याळीज यांच्या शेतातील सफरचंदाच्या बागेकडे वळाले आहेत.

Apple
नाशिक-पुणे रेल्वे : बाधित शेतकऱ्यांना मिळणार ५ पट मोबदला?



सफरचंदाची बाग यशस्वी करून दाखविली. पुढील काळात आपल्या शेतात सफरचंदाचे पीक घ्यायचे का, यासाठी कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ.
- चंद्रकांत ह्याळीज, शेतकरी, आखतवाडे

संशोधक वृत्तीतून विविध प्रयोग

बागलाणच्या शेतकऱ्याने प्रतिकूल परिस्थितीत फळशेतीत ऐतिहासिक क्रांती केली आहे. निसर्गाने तडाखा देऊनही शेतकरी पुन्हा शेतात राबून ताठ मानेने उभा राहिला आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर सर्वच काही यशस्वी करून दाखवले आहे. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कांदा, डाळिंब, द्राक्ष या फळांची लागवड करून चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्याचा उच्चांक गाठला. नोकरीच्या मागे न धावता आपल्या मुलांना नवनवीन प्रयोगातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीतूनच पैसा कमविण्याचे धडे दिले. तालुक्यातील प्रयोगशील युवा शेतकऱ्यांनी बागलाणच्या मातीत निरनिराळे प्रयोग करून आपल्यातील संशोधकवृत्ती जोपासली आहे.

(Farmers in Baglan have started producing apples nashik news)

Apple
नाशिक शहर बससेवेसाठी ९ मार्ग निश्चित; ITMS प्रणालीद्वारे होणार संचलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.