Nashik: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नव्हे, तर अर्ध्यावर आणले! कोटमगाव येथे सरकारला विरोध करत ग्रामस्थांनी सुनावले खडेबोल

Protest
Protestesakal
Updated on

येवला : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे सांगत होते. मात्र कांद्याला काल चार हजाराचे भाव अन् आज दोन हजारांवर आले... म्हणजे भाव दुप्पट नाही तर अर्ध करून ठेवले आहेत.

विकास नेमका आहे कुणाचा, असा प्रश्न करत हे व्यापारी सरकार असून, शेतकरी विरोधाचे असल्याने हा विकासरथ एक सेकंदही येथे थांबू नका...त्यांची संकल्प यात्रा नको अन् काहीच नको, अशा शब्दांत कोटमगाव विठ्ठलाचे येथे सरकारच्या विकास रथाला विरोध करत ग्रामस्थांनी खडेबोल सुनावले. (Farmers income not doubled but halved In Kotamgaon villagers protested against government Nashik)

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या योजनांची व धोरणांच्या माहितीच्या प्रचारासाठी तयार केलेला संकल्परथ व त्यासोबत आलेल्या स्क्रीनिंग व्हॅनसह सरकारी कर्मचारी गावोगावी जात आहेत.

ग्रामसेवक तसेच गावातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या रथाद्वारे प्रचार-प्रसार सुरू असून, तालुक्यातील विविध गावांना हा रथ रोज जात आहे. काही ठिकाणी ग्रामस्थ प्रतिसाद देत आहेत, तर काही ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत.

त्यातच केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा दरात घसरण झाल्याने शेतकरी शासनाच्या विरोधात संतप्त होत असल्याचा प्रत्यय येवल्यात आला. नियोजननुसार रविवारी कोटमगाव (विठ्ठलाचे) येथे हा रथ व कर्मचारी आले होते.

मात्र, विठ्ठलाच्या मंदिरासमोर पटांगणात व्हॅन उभी करून सुरू करण्यापूर्वीच ग्रामस्थ व युवकांनी माहिती दर्शविण्यास विरोध दर्शविला.

या संदर्भातचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर फिरत असून, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातच ही घटना घडल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Protest
National Peoples Court: लोकअदालतीत 11 हजार प्रकरणांचा निपटारा! 80 कोटी 54 लाखांचे तडजोड शुल्‍काची वसुली

आमचा विरोध शेतकरीविरोधी धोरणाला

या व्हिडिओत तरुण म्हणतात, ‘‘आम्हाला कार्यक्रमाला विरोध करायचा नाही, पण शेतकरीविरोधी धोरणांना विरोध आहे.

आम्ही येथे प्रवेशबंदीचा फलक लावून आरक्षणासाठी आंदोलन करत असताना तुम्ही येथे येऊन रथ उभा केला, हे योग्य आहे का?. आम्हाला तुमच्या कोणत्याही योजना नकोत, कारण त्या फसव्या असतात.

शेतकऱ्यांचे सगळं वाटोळं केलं आणि आता विकास सांगत आहेत. आम्हाला उत्पन्नच नाही अन् जे थोडेफार आहे, त्याचाही जाळ झाला आहे. दूरचित्रवाणीवर चेहरा पाहून कंटाळलो आहोत.

आता नकोच तो फोटो अन् प्रचार.’’ काही युवकही या प्रसंगाचे व्हिडिओ काढत असताना व्हिडिओ काढू नका, असे एका अधिकाऱ्यांने सांगितले.

रात्रीतून नोटबंदी होते, निर्यातबंदी होते. तिकडे पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आणि शेतकऱ्यालाच भाव नाही. शेतकरी कुठेतरी गारपीट, दुष्काळातून सावरत नाही तोच भाऊंनी कांदा निर्यातबंदी करून टाकली.

काही खरं राहिलेले नाही, अशी उद्दीग्न प्रतिक्रियाही युवकांनी व्यक्त केली. जनतेची एवढीच काळजी आहे, तर पेट्रोल-डिझेल, गॅस, निम्म्या भावात करा आणि शेतकऱ्याला योग्य भाव द्या.. एवढे केले तरी बरे होईल.

Protest
Nashik News: 2 लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित! आदिवासी विभागाचा सावळागोंधळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.