Nashik: देशामध्ये दशकात अन्नधान्य उत्पादनात शेतकऱ्यांनी केली 734 लाख टनाने वृद्धी; विक्रमी उत्पादनाचा अंदाज

Food Production
Food Productionesakal
Updated on

Nashik : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२२-२३ साठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा तिसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार देशात अन्नधान्याच्या ३३०५.३४ लाख टन उत्पादनाचा अंदाज असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे.

हा अंदाज पाहता, दहा वर्षांमध्ये देशातील शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या उत्पादनात ७३४.१२ लाख टनाने वृद्धी केल्याचे स्पष्ट होते. अन्नधान्याचे २५७१.२२ लाख टनाचे उत्पादन शेतकऱ्यांनी २०१२-१३ मध्ये घेतले होते. (Farmers increased foodgrain production by 734 lakh tonnes in country in decade Forecast for record production Nashik)

मंत्रालयाच्या अहवालानुसार तांदूळ, गहू, मका, सोयाबीन, मोहरी, उसाच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे. श्री. तोमर यांनी हे यश शेतकऱ्यांची मेहनत, शास्त्रज्ञांचे प्रावीण्य आणि सरकारच्या शेतकरी हिताच्या धोरणामुळे मिळाल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, यंदाचे अन्नधान्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत १४९.१८ लाख टनाने अधिक असेल. तांदळाचे १३५५.४२ लाख टन उत्पादन अपेक्षित असून, गेल्या वर्षीपेक्षा ते ६०.७१ लाख टनांनी अधिक असेल. रब्बीमधील गव्हाचे ११२७.४३ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे, तर गेल्या वर्षी १०७७.४२ लाख उत्पादन मिळाले होते.

देशात २०२२-२३ मध्ये तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार मिळणारे उत्पादन लाख टनामध्ये असे ः (कंसात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिकचे अपेक्षित असलेले उत्पादन लाख टनामध्ये दर्शवते) : मका- ३५९.१३ (२१.८३), डाळी- २७५.०४ (२.०२),

तेलबिया- ४०९.९६ (३०.३३), ऊस- ४९४२.२८ (५४८.०३), सोयाबीन- १४९.७६ (१९.८९). याशिवाय अंदाजानुसार कापसाचे उत्पादन ३४३.४७ लाख गाठी (प्रत्येकी १७० किलो), ताग आणि मेस्ताचे उत्पादन ९४.९४ लाख गाठी (प्रत्येकी १८० किलो) इतके अपेक्षित आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Food Production
Nashik ZP: जिल्हा परिषदेचा आर्थिक ताळमेळ लागेना; विभागप्रमुखांकडून वित्त विभागास माहिती सादर होईना

उत्पादनातील संभाव्य घट

० ज्वारी : यंदा ३९.९० लाख टन अपेक्षित- गेल्या वर्षी ४१.५१ लाख टन उत्पादन (१.६१ लाख टन घट)

० खरीप तूर : यंदा ३४.३० लाख टन अपेक्षित- गेल्या वर्षी ४२.२० लाख टन उत्पादन (७.९० लाख टन घट)

० उडीद : यंदा २६.१२ लाख टन अपेक्षित- गेल्या वर्षी २७.७६ लाख टन उत्पादन (१.६४ लाख टन घट)

(रब्बीमधील हरभऱ्याचे यंदा जवळपास गेल्या वर्षी इतके म्हणजे १३५.४३ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे.)

Food Production
NMC Water bill : पाणीपट्टी देयक वाटपाची वाटचाल खासगीकरणाकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()