नाशिक : सारुळ येथील खाणपट्टयात अनधिकृतरीत्या सुरु असलेल्या गौणखनिजाच्या उत्खननाविरोधात बाधित शेतकरी एकवटले असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माफियांवर कारवाईचे दिलेले आदेश न पाळणार्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करीत मुंबईला २३ जानेवारीपासून आझाद मैदानावर आंदोलन करीत बेमुदत उपोषणास बसले आहे. (Farmers on hunger strike in Mumbai regarding Sarul mining lease Demand action against officials Nashik News)
सारुळच्या १२४, १२५ गटातील खाणपट्ट्यात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर उत्खननामुळे खाणपट्टयाच्या सभोवताली असणारी शेकडो एकर बागायती जमीन प्रभावित झाली आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी आता थेट मुंबई गाठत उपोषण सुरू केले आहे.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी सारुळच्या गजानन स्टोन क्रेशरला खाणपट्टा कायमस्वरूपी रद्द करुन दंडात्मक कारवाई करण्यात यावी. दगड व्यावसायिकांना गौणखनिज माफिया बनविणाऱ्या नाशिकच्या जिल्हाधिकारी, तहसीलदार, खनिकर्म अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी.
खाणपट्टाधारकांच्या बेकायदेशीर उत्खननात सहभागी असणाऱ्या शासनाच्या उदासीनतेमुळे निसर्गसंपदेचे होणारे नुकसान टाळावे. सात एकरवरील खाणपट्टा परवानगी असताना सत्तेचाळीस एकरावरील सुरु असलेले बेकायदेशीर उत्खनन तात्काळ रद्द झाले पाहिजे.
महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाई न करणाऱ्या महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडून उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.